जखमींना टायगर ग्रुपची मदत; एक कॉल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी..

437

प्रितम गग्गुरी (अहेरी तालुका प्रतिनिधी)

एटापल्ली: तालुक्यातील बीड्री येथील बालाजी गोटा व संतोष गोटा हे दोघे काही कामानिमित्त आपल्या दुचाकीने ६ जून २०२२ ला गोंडपिपरी येथे गेले होते. गोंडपिपरी येथील आपले काम पूर्ण करून दुचाकीने आपल्या गावी परत येत असतांना बोरी येथे त्यांचे दुचाकीवरून नियंत्रण सुटले. दुचाकीवरचे नियंत्रण सुटल्याने दुचाकीची झाडाला धडक बसली. ही घटना सायंकाळी ४:३० वाजता घडली.

या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना मदत मागितली असता कुणीही जखमींना दवाखान्यात नेण्यासाठी तयार नव्हते. तेव्हा तिथे उपस्थित लोकांपैकी एकाने टायगर ग्रुप जनसंपर्क कार्यालय आलापल्ली येथे संपर्क केला व सदर अपघाताची माहिती दिली. माहिती मिळताच टायगर ग्रुपचे सचिव आदर्शभाऊ केशनवार, कोषाध्यक्ष सागर रामगोनवार, रक्तसेवक कुणाल वर्धलवार यांनी तात्काळ टायगर गृपची रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी पोहचून अपघातग्रस्तांना अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती केले. तिथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचाराकरिता गडचिरोली जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. या सामाजिक कार्याबद्दल सर्व क्षेत्रातून टायगर ग्रुपच्या सदस्यांचे अभिनंदन करण्यात आले.