ग्रामपंचायत अडेगांव येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन साजरा…

429

-शरद कुकूडकार (भंगाराम तळोधी प्रतिनिधी)

भंगाराम तळोधी :- छत्रपती शिवाजी महाराज यांचा ६ जून १६७४ या दिनी रायगडावर राज्याभिषेक झाला होता. या महापुरुषांच्या लोक कल्याणकारी स्वराज्यातील महत्त्वाचा दिवस म्हणजेच शिवराज्याभिषेक दिन होय. दरवर्षी रायगडावर अत्यंत उत्साहात जल्लोषात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो.

रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन स्वराज्याची,सार्वभौमत्वाची व स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा आहे. या दिनाचे महत्त्व आणखी दृढ होण्यासाठी म्हणून महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत स्तरावर हा दिवस शिवराज्याभिषेक म्हणून साजरा करण्यात येत आहे. त्यातच आज ६ जून २०२२ ला ग्रामपंचायत अडेगांव येथे राज्याचा शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला.

ग्रामपंचायत अडेगांव येथे छत्रपती शिवरायांचा शिवराज्याभिषेक दिन साजरा करताना ग्रा.प. सरपंच सौ.रेखाताई चौधरी, उपसरपंच विजय चौधरी,सदस्य श्री. शालिकभाऊ झाडे, सौ. अल्काताई नागापूरे,सौ.सोनिताई उबरकर, श्री. संतोष कोवे, ग्रामसेवक पि डी राऊत,संगणन परिचालक. नरेश झाडे, पोलिस पाटील. दामोदर राऊत, अंगणवाडी सेविका सौ. जिजाबाई तिवाडे, सौ.जोस्तना पिपरे, ग्रामपंचायतीचे कर्मचारी व गावातील नागरिक उपस्थित होते.