गटबाजी न करता कार्यकत्यांनी संघटीत होऊन काम करावे… काॅंग्रेसचे चंद्रपुर जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी संजयजी पासवान यांचे प्रतिपादन…

567

नागभीड: काॅंग्रेस पक्ष फार जूना पक्ष असुन स्वातंत्र्यापुर्विपासुन आधुनिक भारताच्या घडणीत सगळ्यात अधिक कामगिरी काँग्रेसने केली आहे.इंग्रजी साम्राज्यशाही सत्तेपासुन भारत मुक्त व्हावा म्हणुन भारतीय स्वातंत्र्याची चळवळ मुख्यता काँग्रेसच्या नेतृत्वाखाली झाली. व काँग्रेस हा प्रत्येक घराघरात पोहचणारा पक्ष आहे.त्यासाठी प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्यांनी गटबाजी न करता संघटीत होवून पक्षात काम करावे.असे प्रतिपादन काँग्रेसचे चंद्रपुर जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी संजय पासवान यांनी केले. ते नागभीड येथील तालुका काँग्रेस कार्यालय आयोजित अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या पक्ष संघटन निवडणूक कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे महासचिव डाँ.अविनाशभाऊ वारजूकर, चंद्रपुर जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष प्रकाशजी देवतळे, नागभीड तालुका निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाशजी वासु, चिमुर तालुका निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोदजी वासेकर,चिमुर विधानसभा समन्वयक डाँ.सतिशभाऊ वारजूकर,नागभीड तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रमोदभाऊ चौधरी,चिमुर तालुका अध्यक्ष संजयजी घुटके,चिमुर तालुका काँग्रेस कार्याध्यक्ष विजयजी गावंडे, नागभीड तालुका काँग्रेस सचिव दिलीपजी मानापूरे, नागभीड तालुका कार्याध्यक्ष गणेशभाऊ गड्डमवार,नागभीड शहरअध्यक्ष डाँ.रविंद्रजी कावळे,मा.जिल्हा सरचिटनिस अमिरजी धम्मानी, नागभीड काँग्रेस कोषाध्यक्ष रामकृष्णजी देशमुख चिमुर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष रोशनभाऊ ढोक, चिमुर व नागभीड येथील नगरसेवक,जि.प.सद्स्य,पं.स.सद्स्य,युवक काँग्रेस,महिला काँग्रेस पदाधिकारी व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.