चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेस (ग्रामिण) ची पहिली आढावा बैठक संपन्न

643

महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस च्या अध्यक्षा आदरणीय संध्या ताई सव्वालाखे यांच्या सूचनेनुसार चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेस ग्रामीण च्या अध्यक्षा नम्रता आचार्य – ठेमस्कर यांच्या अध्यक्षतेखाली आज शासकीय विश्रामगृहात जिल्हा महिला काँग्रेस ग्रामीण ची आढावा बैठक संपन्न झाली.यावेळी जिल्हाध्यक्षा नम्रता आचार्य ठेमस्कर यांनी महिलांना मार्गदर्शन करतांना ‘मला मान कमी दिला तरी चालेल पण काम जास्त करा’ असा कानमंत्र उपस्थित महिला पदाधिकाऱ्यांना दिला. महिला काँग्रेस चे काम प्रत्येक तालुक्यातच नाही तर प्रत्येक घरात पोहचवायचे आहे व काँग्रेस चे संघटन क्रमांक एकचे करायचे आहे असे आवाहन यावेळी ठेमस्कर यांनी केले. उपस्थित महिला पदाधिकाऱ्यांनी सुद्धा आपला अनुभव व अडचणी या विषयी आपले मत व्यक्त केले.

या बैठकीला उपाध्यक्षा सुनीता धोटे, उपाध्यक्षा हर्षा चांदेकर, सेवादल महिला काँग्रेस च्या शहर अध्यक्षा लता बारापात्रे, शालिनी भगत, वाणी डारला, माजी जिल्हा परिषद सदस्य ममता डुकरे, भद्रवती तालुका अध्यक्षा वर्षा ठाकरे, सिंदेवाही तालुका अध्यक्षा सीमा सहारे, राजुरा तालुका अध्यक्षा कविता उपरे, राजुरा शहर अध्यक्षा संध्या चांदेकर, सावली शहर अध्यक्ष भारती चौधरी, गोंडपीपरी तालुका अध्यक्षा रेखा रामटेके, वरोरा तालुका अध्यक्षा चित्रा अहिरकर, बल्लारपूर तालुका अध्यक्षा अफसाना सय्यद, जिवती तालुका अध्यक्षा नंदा ताई मुसने,नंदा नगराळे, रुपा ताडूरवार, निमंत्रीता कोकाडे, वनिता जानबोजवार, भारती चौधरी, निर्मला कुळमेथे, योगिता भोयर, अर्चना गर्जेलवार, कुसुम जाधव, शितल गेडाम, लता इंदूरकर, त्रिवेणी पदमा, संध्या मंडल, निधी चौधरी, स्मिता पारधी, सुनंदा जीवतोडे यांच्यासह इतर सेल चे पदाधिकारी व महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या त्याच बरोबर या बैठकीच्या यशस्वीतेसाठी मुन्ना तावाडे आणि इंजिनिअर नरेंद्र डोंगरे यांनी विशेष परिश्रम घेतले.