नागपूर: १० दिवसापूर्वी संध्याकाळच्या वेळेला जवळपास ७ वाजले होते,अचानक एक कॉल आला. तो कॉल होता बिबी (सावळी ) त. हिंगणा जि. नागपूर या गावातील कर्मयोगी फाऊंडेशनने विधवा ताईंच्या मुलीला जो शिक्षणातील उत्साह वाढावा म्हणून सायकल स्वरूपी भेट दिली त्या ताईचा, ती म्हणाली माझ्या गावामध्ये एक अनाथ मुलगा आहे. जन्मापासून आईवडीलांचे प्रेम काय असते हे त्याने पहिलेच नाही. त्याचे सायकल चालविण्याचे स्वप्न आहे. त्याला तुम्ही सायकल देऊन त्याचे स्वप्न पूर्ण करणार का? मी लगेच कर्मयोगी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. पंकज ठाकरे व संपूर्ण सदस्यांना माहिती दिली. त्यानंतर लगेचच अध्यक्ष महोदय यांनी बिबी या गावाला जाऊन त्या अनाथ मुलाची माहिती घ्या आणि सर्वेक्षण करीता सर्वेक्षण प्रमुख श्री. नंदकिशोर मानकर व मी प्रसिद्धीप्रमुख श्री. नितेश आत्राम या गावी गेलो. कु. वैष्णवी लिडबे (लाभार्थी सायकल वाटपाचा दुसरा टप्पा )यांचे घर माहिती असल्यामुळे सरळ त्यांच्या घरी गेलो. चि. आदेश न. चिचघरे (अनाथ ) व त्याची आजी गं. भा. इंदुबाई अ. चिचघरे यांच्या घर शेजारीच असल्यामुळे आम्ही त्यांच्यापर्यंत पोहचलो. आणि माहिती घेण्यास सुरुवात केली . चि. आदेश नरेश चिचघरे हा अवघा ४ दिवसाचा असतांना त्याची आई स्व. विद्या न. चिचघरे यांची दवाखान्यामध्येच बाळातपणातच प्राणज्योत मावळली, त्यानंतर चि. आदेश चा सांभाळ तब्ब्ल ११ महिन्यापर्यंत त्याची मोठी आई सौं.ललिता राजेंद्र झाडे रा. येळाकेळी यांनी केला. यासाकाळात वडील दुसर लग्न करून मोकळे झाले. वडील वागवायला तर सोडा परंतु त्या निरागस मुलांसोबत दोन प्रेमव्हे शब्द सुद्धा बोलत नाहीत. त्यामुळे आजपर्यंत संपूर्ण सांभाळ आजीने केला पण आजीला आता डोळ्याने दिसत नसल्यामुळे चि. आदेश आणि त्याची आजी यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ लागली.आता माझ्या नातवाचे काय होईल? कोण सांभाळ करेल? असा प्रश्न आजीसमोर उभा राहिला.आजीने स्वतःच्या मुलीकडे जाण्याचा निश्चय केला आणि नातवाला घेऊन बिबी या गावी आली. स्वतःच्या मुलीकडे आल्यानंतर त्यांचा संसार पण हातावर आणून पानावर खाणे असा आहे हे कळले. तरीपण चि. आदेश याचे मामाजी श्री.शांताराम लक्ष्मण लिडबे व आत्या सौं.सुनिता शा. लिडबे यांनी त्याचा पालनपोषण करण्याची जिम्मेदारी घेतली, चि. आदेश हा श्रीकृष्ण हायस्कूल, कान्होलीबारा (जवळपास अंतर ७किमी )येथे शिक्षणासाठी कोणाच्यापन गाडीला लिफ्ट मागून जात असे कधी गाडी न मिळाल्यामुळे घरीच राहायचा आणि रडायचा. शिकण्याची खूप जिद्द पण परिस्थिती नव्हती कि कोणी सायकल सुद्धा घेऊन देणार. ही संपूर्ण हकीकत संस्थापक अध्यक्ष व संपूर्ण टीमला सांगितली. लगेचच संस्थापक अध्यक्ष यांच्या मुखातून निघाले,आपण आदेशला मदत करू. तो अनाथ नाही आहे कर्मयोगी फाऊंडेशन त्याच्या सोबत आहे. आपण त्याला घरी जाऊन शाळेत जाण्याकरिता सायकल देऊन त्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलवू व शिक्षणातील उत्साह वाढवू. दिनांक २३/०६/२२ला बिबी या गावी जाण्याचे ठरले आणि आज संस्थापक अध्यक्ष मा. श्री. पंकज ठाकरे, मार्गदर्शक मा. श्री. तुलसीदास भानारकर सर व मी प्रसिद्धीप्रमुख श्री. नितेश स. आत्राम बिबी या गावी जाऊन कर्मयोगी फाऊंडेशन तर्फे चि. आदेश नरेश चिचघरे या अनाथ मुलाला मायेची सावली म्हणून सायकल स्वरूपी भेट देऊन त्याचे स्वतःची सायकल असण्याचे स्वप्न पूर्ण केले.