गोंडपिपरीत तालुक्यात कृषी संजीवनी मोहीमेला प्रारंभ… कृषी विभागाकडून प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन…

551

शरद कुकुडकार (भंगाराम तळोधी प्रतिनिधी)

भंगाराम तळोधी :- 25 जून ते 1 जूलै या दरम्यान राज्यात सर्वत्र कृषी संजीवनी मोहीम राबविण्यात येत आहे याच धर्तीवर गोंडपिपरी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने तालुक्यातील गावा गावात प्रात्यक्षिकाद्वारा जणजागृती करीत मोहीमेला सूरवात करण्यात आली यात अनेक शेतकऱ्यांनी सहभाग दर्शविला यंदाचा खरीप हंगाम यशस्वी व्हावा व आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पाहचावे हा हेतू घेत राज्यात कृषी संजीवनी मोहीम राबवली जात आहे.

शनीवारी गोंडपिपरी तालूक्यात या मोहीमेचा शुभारंभ करण्यात आला तालुका कृषी अधिकारी श्री मंगेश पवार यांच्या मार्गदर्शनात विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अनेक गावांत आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती शेतकरी बांधवांना दिली विठ्ठलवाडा, येनबोधला, पारडी येथे विविध पिक लागवड तंत्रज्ञान अंतर्गत शेतकरी बांधवांना कापूस सोयाबीन भातपिक लागवडी संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.

अनेक क्षेत्रीय भेट आयोजित करुन सोयाबीन जोळ ओळ लागवन सरी वरंबा व कापूस लागवडी बाबत माहिती देण्यात आली. घडोली येथे सोयाबीन बिज प्रक्रिया प्रात्यक्षिक बूरशीनाशक कीटकनाशक रायबोझीयम करण्यात आले सोयाबीन टोकन पद्धतीने लागवडीची माहिती देण्यात आली हिवरा,गुजरी,भंगारपेट येथे फ्लशकार्डाद्वारे कापूस भात सोयाबीन निंबोळी अर्क वापराबाबत मार्गदर्शन देण्यात आले सालेझरी येथे 3% मिठाची पाण्याची आणि आॅझोटोबक्टरची बिज प्रक्रिया दाखवण्यात आली.

सोनमपल्ली दशपर्णी अर्क बणवण्याचे प्रात्यक्षिक तर दुबारपेठ येथे शेतीशाळा आयोजित करण्यात आली तालुका कृषी अधिकारी श्री मंगेश पवार यांच्या मार्गदर्शनात विभागाच्या कर्मचाऱ्यांनी संजीवनी मोहीमेत मार्गदर्शन केले

कृषी संजीवनी मोहीमेच्या माध्यमातून आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती देण्यात येत आहे 25 जून ते 1 जूलै या दरम्यान या काळात राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत विविध हातळण्यात येणार आहे खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी ही मोहीम फायदेशीर ठरेल

मंगेश पवार
तालुका कृषी अधिकारी गोंडपिपरी