पाण्याच्या अंदाज नसल्या ठिकाणीं वाहने घालू नये.. अतिवृष्टीच्या वेळी नागरिकांनी सतर्कता बाळगावी.. आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचे नागरीकांना आवाहन..

664

प्रितम गग्गुरी (अहेरी तालुका प्रतिनिधी)

अहेरी:- काल पासुन सूरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे, त्यासोबत अनेक दुर्गम भागातील गावांचा संपर्क मुख्यालयासी तुटला आहे, पावसाचे प्रमाण वाढत आहे, लहान रपटे, नाले, नदी तुडुंब भरून वाहत आहेत, तर ठीक ठिकाणीं पूर परिस्थिती निर्माण झाली आहे तसेच वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहेत, येथील जनतेने सुरक्षा बाळगावी. पाण्याचा अंदाज नसल्यास त्या ठिकाणीं वाहने वैगरे घालू नये असे माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी जनतेला आहावन केलें आहे.

मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे, पुलावरुन पाणी वाहत असताना पाण्याचा अंदाज नसल्यास कोणीही वाहने किंवा स्वतः वाहत्या पाण्यातून मार्ग काढत जाऊ नये, सुरक्षित ठिकाणी विसावा घ्यावा, पाणी ओसरल्यानंतर आपापल्या घरी कींवा शेत शिवारात जावे व लहान मुलांना पाण्याच्या ठिकाणी सोडू नये याची जनतेने खबरदारी घ्यावी.
तसेच सूरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याची पातळीत वाढ होत आहे, नाल्या नदीकाठच्या गावामधील ग्रामस्थांनी गुरे ढोरे सोडू नयेत, ड्याम, नाले, नदी पात्रात मासेमारी करण्यासाठी अथवा इतर कुठल्याही कारणास्तव विनाकारण जाऊ नये सुरक्षित ठिकाणी राहून काळजी घ्यावी असे आवाहन माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी जनतेला केलें आहे.