टायगर ग्रुप आलापल्ली तर्फे पूरग्रस्तांना व अडकलेल्या प्रवाश्यांना मदत..

1288

प्रितम गग्गुरी ( अहेरी तालुका प्रतिनिधी )

अहेरी: तालुक्यातील नागेपल्ली येथे पूर आल्याने ७ तास वाहतूक ठप्प झाली होती. यात अनेकजण अडकून होते. त्यावेळी महामंडळ बस मध्ये बसलेल्या प्रवाश्यांना व अडकलेल्या SRPF जवानांना नास्ता व पाणी बॉटल वाटप टायगर ग्रुप आलापल्ली तर्फे करण्यात आले..

सोबतच आलापल्ली येथील गोलकर मोहल्ला वॉर्ड क्र.६ येथे पूर आल्यामुळे अनेक लोकांच्या घरात पाणी शिरले आहे. यावेळी टायगर ग्रुप चे सदस्यांनी पूरग्रस्तांच्या घरगुती सामान काढायला मदत केले व त्यांचा जेवणाची सोय ग्रुप तर्फे करून दिली.

त्यावेळी उपस्थित ग्रा.प.सदस्य सोमेश्वर भाऊ रामटेके टायगर ग्रुप प्रमुख सदस्य ,दौलत भाऊ रामटेके,साई भाऊ तुलसीगारी, श्रीकांत जिल्लेवार,छोटू सडमेक,धनंजय चक्रमवार ,धनराज रामटेके , राहुल मेश्राम ,हसन पठाण ,प्रकाश सिंगनेर, राहुल पेंद्दीवार , अक्षय कुलमेथे, प्रवीण भिमनपल्लीवर,अमोल सामिलवार ,मोन्टी नागपुरे,नीरज सामिलवार , रोहन पसपनूरवार दीक्षांत मडावी, मयूर मडावी, कुणाल तुमडे , गणेश तुमडे, साई येरावार,साहिल तुमडे, यश,समस्त टायगर ग्रुप आलापल्लीचे सदस्य व SRPF जवान उपस्थित।