अतिवृष्टीत नुकसान झालेल्या पीकांचे पंचनामे करून शेतकऱ्याना नुकसान भरपाई भरून द्यावी.. सामाजिक कार्यकर्ता दिपक सुनतकर यांची मुख्यमंत्र्याकडे निवेदनाद्वारे मागणी.

651

प्रितम म. गग्गुरी (अहेरी तालुका प्रतिनिधी)

अहेरी :- गेला १५ दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे गडचिरोली जिल्हातील दक्षिण अहेरी मध्ये पुराच्या पाण्याने शेतकऱ्यांचे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसानाची तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्याना नुकसान भरपाई भरून द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता दिपक सुनतकर यांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्याकडे पाठविण्यात आलेल्या निवेदनातुन मागणी केली आहे.

गेल्या १४ ते १५ दिवसांपासून गडचिरोली जिल्हात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरु आहे, त्याच बरोबर दक्षिण अहेरी उपविभागातील मुलचेरा, भामरागड, एटापल्ली, अहेरी, आणि सिरोंचा या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली असून शेतशिवारासकट गावामध्ये पुराचे पाणी आले आहे, त्यामुळे खरीप हंगामातील कापूस, धान, तुर आदी पिकांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच त्या शेत शिवारात नाला, नदीचे पाण्यासह वाहत आलेली रेती शिरल्याने मोठ्या प्रमाणात पीकाचे नुकसान झाले आहे.

त्यामुळे पिकांचे नुकसानाची तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्याना नुकसान भरपाई भरून देण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता दिपक सुनतकर यांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे.