अपघातातील जखमींना टायगर ग्रुपकडून मदतीचा हात…

799

प्रितम गग्गुरी (अहेरी तालुका प्रतिनिधी)

अहेरी: गुरुवार, दिनांक २१-७-२०२२ ला मेडपली येथील शैलेश जाकेवार आणि त्यांचे सोबतीदार आल्लापल्ली येथे दुकानाच्या कामाकरिता आले होते. काम आटोपून ते परत घरी स्वगावी जाण्यास निघाले पंरतु घरी जात असताना अचानक भामरागड रोडवरील तलवाडा जवळ पिकअप व दुचाकी वाहनांचा अपघात झाला. या अपघातामध्ये दुचाकी वाहनधारकाला जबर मार लागला. या घटनेची माहिती तिथे असलेल्या एका युवकांने टायगर ग्रुपच्या जनसंपर्क कार्यालयाला भ्रमणध्वनीच्या माध्यमातून करून दिली. तात्काळ टायगर ग्रुपचे पदाधिकारी घटनास्थळी पोहोचुन ग्रुपच्या रुग्णवाहिकेने त्यांना ग्रामीण रुग्णालय अहेरी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले माणुसकीचे दर्शन घडविले. यावेळी टायगर ग्रुप आलापल्ली प्रमुख दौलत रामटेके, दीप कानाबार, तुषार पोलेलवार, वेदांत कर्मे उपस्थित होते..