आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून पूरग्रस्तांना जीवनावश्यक अन्नधान्य कीटचे वितरण…

892

-सिद्धार्थ दहागावकर (गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी)

गोंडपिपरी:  यंदा अतिवृष्टीमुळे गोरगरीब जनता अडचणीत आले आहे. अनेकांचा निवारा नाहीसा झाला, त्याबरोबरच तळागाळातील लोकांचा पोटाचा प्रश्न निर्माण झाला.
अश्यातच दीनदूबळ्यांपर्यंत पोहचणारा मदतीचा हात समोर आला. जि प क्षेत्र धाबा तोहगाव, पं स धाबा,ता गोंडपिपरी अंतर्गत नदिकाठी असलेल्या सकमूर या गावातील जनतेकरीता मा.सूधीरभाऊ मुनगंटीवार सदैव जनतेचा सेवेत असणारे, गोरगरीबांसाठी झटणारे देवदूत बनून त्यांचासाठी अन्नधान्य किट उपलब्ध करून दिले.

किट वाटप करतांना श्री अमर भाऊ बोडलावार माजी जि प सदस्य चंद्रपूर, श्री अरूण कोडापे माजी पं स.उपसभापती,श्री मनिष वासमवार माजी पं स.उपसभापती गोंडपिपरी श्री बबन निकोडे भाजपा गोंडपिपरी तालूका अध्यक्ष, श्री गणपती चौधरी प पू शेषराव महाराज व्यसन मूक्ती समिती अध्यक्ष,श्री निलेश पूलगमकर सरपंच संघटना सचिव गोंडपिपरी,श्री स्वप्नील अनमूलवार सदस्य ग्रा पं धाबा,श्री संतोष मूगलवार सदस्य ग्रा पं सकमूर, श्री सुहास माडूरवार प्रतिष्ठित व्यापारी,श्री संजय येलमूले अध्यक्ष सेवा सहकारी संस्था धाबा,व प्रतिष्ठीत गावकरी आदी उपस्थित होते. सर्वांनी त्यांचे आभार मानले.