ट्रक चिखलात फसला आणि कित्येक जनावरांनी मोकळा श्वास घेतला…

853

प्रितम गग्गुरी (अहेरी तालुका प्रतिनिधी)

अहेरी :- आल्लापल्ली येथील AP-24-V- 0426 क्रमांकाचा ट्रॅक भर वेगाने जात होता. सदर ट्रक वेगाने जात असताना नागेपल्ली येथील FDCM ग्राउंड जवळ एका चिखलात फसून गेला आणि तो ट्रक भर वेगाने जात असल्याने सदर ट्रक मध्ये काहीतरी असल्याचे संशय आल्याने टायगर ग्रुप च्या सदस्यांनी ट्रक वर झाकलेली प्लास्टिक खुले करून बघितले असता त्यात जनावरांना कोंबून वाहतूक करत असल्याचे आढळले.

सदर ग्रुपच्या सदस्यांनी ही माहिती अहेरी पोलिसांना दिली. ट्रक मधल्या २७ गोवंशापैकी ८ गाय गंभीर जखमी अवस्थेत होते. टायगर ग्रुपच्या सदस्यांनी त्याच्यावर उपचार केला व त्या २७ गोवंशाना अहेरी पोलीस प्रशासना मार्फत गोशाळेत पाठवण्यात आले. यावेळी टायगर ग्रुप आलापल्लीचे सर्व सदस्य उपस्थित होते.