अपघातातील जखमींना स्वराज्य फाउंडेशनचा मदतीचा हात..एक काल रुग्णवाहिका घटनास्थळी.

607

प्रितम गग्गुरी (अहेरी तालुका प्रतिनिधी)

मोबाईल नंबर:-९५४५६०५१७१

अहेरी :- दानिश मोबिन शेख हा युवक आल्लापल्ली येथील व्यक्ती आहे. दानिश चे वय २९ असून हा युवक काही कामानिमित्त आज पुसुकपल्ली येथे गेला होता आणि दानिश आपलं काम आटोपून परत आल्लापल्ली ला येत असल्यास ठीक ४:३० वाजेच्या सुमारास अचानक दोन दुचाकी मध्ये धडक झाली व या अपघातामुळे दानिश शेख ला जबर मार लागल्यामुळे त्याचा पाय फॅक्चर झाला.

ही बाब त्यांचा घरच्यांनी स्वराज्य फाउंडेशन च्या पदाधिकारींना भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधून महिती दिली आणि ही माहिती मिळताच स्वराज्य फाउंडेशन चे पदाधिकारी घटनास्थळी पोहचले व त्या अपघात ग्रस्त युवकाला अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आणि पुढील उपचाराकरिता चंद्रपूर येथे पाठवण्यात आले.