गोंडपिपरी तालुका काँग्रेसची ९ ऑगस्ट रोजी आझादी गौरव पदयात्रा… करंजी ते आक्सापूर पदयात्रा: महाराष्ट्राचे माजी कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार व आमदार सुभाषभाऊ धोटे यांच्या उपस्थितीत सुरवात…

619

गोंडपिपरी:  स्वातंत्र्याचा हीरक महोत्सव वर्षानिमित्त दिनांक ९ ऑगस्ट २०२२ रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आ. विजयभाऊ वडेट्टीवार व राजुरा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मा. सुभाषभाऊ धोटे यांचे उपस्थितीत गोंडपिपरी तालुक्यातील करंजी ते आकसापुर पर्यंत तालुका कॉंग्रेस कमिटी तर्फे आझादी गौरव पदयात्रा निघणार आहे.

या आजादी गौरव पदयात्रे करिता गोंडपिपरी तालुक्यातील शहरातील तथा ग्रामीण भागातील नागरिकांनी, सर्व विभागाचे व सर्व सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या, युवा कार्यकर्ते यांनी दिनांक ०९/०८/२०२२ रोजी करंजी येथील मुख्य चौकात सकाळी ०९:०० वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन तालुका काँग्रेस कमिटी तर्फे करण्यात आले आहे…