बल्लारपूर मनसेच्या महिलासेनेनी पोलीस बांधवाना राखी बांधून साजरा केला रक्षाबंधनाचा कार्यक्रम..

643

बल्लारपूर:- नेहमी समाजकार्यात अग्रेसर असनार्या महाराष्ट्र नवनिर्मान महिला सेनेच्या बल्लारपूर तालुका अध्यक्षा सौ. कल्पनाताई पोर्तलावार यांच्या नेतृत्वात दरवर्षी रक्षाबंधनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात घेतला जातो यावर्षी सुद्धा मनसेच्या महिला पदाधिकार्यांनी पोलीस स्टेशन बल्लापूर येथील पोलीस बांधवाना राखी बांधून रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा केला पोलीस बांधव आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र आपले कर्तव्य बजाऊन आम्हची रक्षा करतात कोरोना काळात देखील पोलीस बांधवानी नागरीकांची सेवा केली अशीच सेवा आपल्या हातून घळत राहावी व महिलांचे रक्षण करावे यासाठी पोलीस बांधवाना रक्षाबंधन या पवित्र सनाचे औचित्य साधून मनसे महिलासेना बल्लारपूर च्या पदाधिकार्यांनी पोलीस बांधवाना राखी बांधून शहराच्या रक्षणाचे वचन घेतले यावेळेस बल्लारपूर मनसे महिलासेना तालूका अध्यक्षा सौ. कल्पनाताई पोर्तलावार तालुका उपाध्यक्ष शालिनी मेश्राम तालुका सचिव गौराक्का दासरापु रेखा टिपले दिव्या दासरापू गुबूडे शिल्पा रेखा मरासकोले आदि मनसैनिक प्रामुख्याने उपस्थित होते