ग्रामपंचायत आलापल्ली तर्फे उत्कृष्टपणे सामाजिक कार्य करणाऱ्या स्वराज्य फाउंडेशनचे सत्कार

428

प्रितम गग्गुरी ( अहेरी तालुका प्रतिनिधी)

आलापल्ली :- दिनांक १५ऑगस्ट रोजी स्वातंत्रच्या अमृत महोत्सव निमित्य ग्राम पंचायत आलापल्ली तर्फे वीर बाबूराव शेडमाके सभागृहात सत्कार कार्यक्रम घेण्यात आले.
या सत्कार समारंभात स्वराज्य फाउंडेशनच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांचे सत्कार करण्यात आले.स्वराज्य फाउंडेशन हे सामाजिक संस्था आहे हे जे गरजू गरीब लोकांकरिता नेहमी त्यांचा सुख दुःखात सोबत राहतात त्यांचा प्रत्येक अडचणीत मदतीला जाण्याचा धाडस करतात माघील ४५ दिवसांपासून सतत होत असलेल्या पावसाने अनेक वेळा अनेक ठिकाणी पूर आले अश्या वेळेस स्वराज्य फाउंडेशनचे सदस्य पूरग्रस्तांनच्या मदतीला आपल्या जीवाची पर्वा नकरता मध्यरात्री धावले.

स्वराज्य फाउंडेशनच्या रुग्णवाहिकेच्या साह्याने अनेक रुग्णांचे प्राण वाचविण्याचा काम स्वराज्य फाउंडेशन करत येत आहे.तसेच रुग्णांना रक्त मिवून देण्यासाठी मदत स्वराज्य फाउंडेशन हे नेहमी करत असतात.

अश्या उत्कृष्ट सामाजिक कार्य करणाऱ्या स्वराज्य फाउंडेशनच्या कार्याचा दखल ग्राम पंचायत आलापल्ली ने घेतले व अमृत महोत्सवा निमित्य सत्कार समारंभ घेऊन स्वराज्य फाउंडेशनचे सत्कार करण्यात आले.तिथे उपस्थित स्वराज्य फाउंडेशनचे सर्व सदस्य पुढे असच सामाजिक कार्य करत राहणार आणि नेहमी सर्वांचा सुख दुःखात सोबत राहणार असे बोलण्यात आले.