तात्काळ प्रशासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन त्यांना आधार द्यावा…

415

बळीराम काळे/जिवती

जिवती: तालुक्यातील सतत झालेल्या अतिृष्टीमुळे शेतकऱ्याच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सततच्या नदी नाल्याच्या महापूरमुळे अनेक शेतकऱ्याचे शेतीचे नुकसान होऊन तसेच ग्रामीण भागात खेडो पाडी घरात पाणी शिरून घरातील मालाचे नुकसान झाले आहे. व चंद्रपुर जिल्ह्यातील जिवती तालु्यातील अनेक गावाचे अतिृष्टीमुळे जास्त प्रमाणात नुकसान झाले.असल्यामुळे अनेक शेकऱ्यांच्या कापूस,ज्वारी, मूग,उडीद,तुर ईत्यादी पीक नष्ट होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झालेआहे.

शेतकऱ्यांवर कोसळलेल्या नैसर्गिक संकटचा सामना करावा लागत आहे.तसेच दोन वर्षाच्या कोरोना काळाच्या महामरित कोणतही काम नव्हत व एकीकडे अतिृष्टीमुळे शेतकरी हा हवलदील झाला. असून शेकऱ्यांना अनेक प्रश्न निर्माण होत आहे.जसे शेतकऱ्यांनी कर्ज काढून बी बियाणे विकत घेऊन रोवणी केली आहे.

दोन ते तीन वेळा कापूस बियाची रोवणी केली आहे.अशा महागाईच्या काळात शेतकऱ्यांवर डोंगर कोसळल्याचे दृष पहावयास मिळत आहेत.त्यांना सतत चिंता भेडसावत राहते की,मी पुन्हा कर्ज बाजरी होइल की काय,शेतकऱ्याच्या मुलाचे शिक्षण, कुटंबांची जबाबदारी, लग्रकार्य, या विविचनेत शेतकरी अडकला आहे.

त्यासाठी ग्रामीण भागातील कार्यकर्ते व नागरीक यांनी अतिृष्टीमुळे, सततच्या पावसामुळे, पुरामुळे,नुकसान झालेल्यांचे तात्काळ मदत करून नुकसान ग्रस्तांना प्रशासनाने त्वरित मदत द्यावी अशी मागणी करण्यात आली.