चिमूर क्रांती व बलिदानाचा इतिहास अजरामर राहणार -आ. वडेट्टीवार…क्रांतीदिनी क्रांतीविरांना वाहिली श्रध्दाजंली…

380

भारत देशात व्यापारी म्हणून येऊन जातीय तेढ निर्माण करून देशाची सूत्रे हाती घेणारे इंग्रजांनी राज्यकर्ते म्हणून प्रचंड प्रमाणात नागरिकांवर अन्याय अत्याचार केले. इंग्रजांच्या विशाल फौजफाट्यासमोर आव्हान देणाऱ्या बलिदानी क्रांतिकार्यांनी स्वातंत्र्य चळवळीची मुहूर्तमेढ केली. स्वातंत्र्याच्या या इतिहासात चिमूर क्रांतीची सुवर्ण अक्षरांनी नोंद असून चिमूर क्रांती व बलिदानाचा इतिहास अजरामर राहणार असे प्रतिपादन राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते, आ. विजय वडेट्टीवार यांनी केले ते क्रांती दिनानिमित्त चिमूर येथे आयोजित श्रद्धांजली कार्यक्रमा प्रसंगी बोलत होते.

याप्रसंगी प्रामुख्याने माजी आमदार तथा प्रदेश महासचिव डाॅ. नामदेव उसेंडी, प्रदेश ओबीसी सेल संघटक धनराज मुंगले, कोषाध्यक्ष प्रभाकर वासेकर, माजी जि.प. सदस्य गजानन बुटके, माजी संचालक सि.डी.सी.बॅंक संजय डोंगरे, सरचिटणीस ओबीस सेल राजू लोणारे,ज्येष्ठ नेते भीमरावजी ठवरे, माजी सभापती किशोर शिंगरे, प्रफुल खापर्डे, सिंदेवाही नगराध्यक्ष स्वप्निल कावळे, कृष्णाजी तपासे, संदीप कावरे, उमेश हिंगे, तुषार शिंदे,कल्पना इंदुरीकर ,नितीन कटारे,राजू हिंगणकर,शंकर माहुरे ,राजू दांडेकर, प्रमोद दांडेकर, ,प्रशांत ढवळे, सुधीर पोहनकर ,मनीष नंदेश्वर, सुधीर पंदीलवार, यशवंत वाघे,जावा भाई, विलास डांगे,प्रदीप तळवेकर ,निखिल डोईजड ,रीता अंबादे, पारस नागरे, सोनू कटारे ,मुरलीधर निमजे, नाना नंदनवार, शम्मी शेख ,तुळशीराम बनसोड ,किसन कुंमले, चंद्रशेखर गिरडे ,राकेश साठवणे ,श्रीकृष्णा झिलारे ,अंकुश मेहरकुरे ,बंटी शिंदे तसेच काँग्रेस पक्षाचे समस्त पदाधिकारी कार्यकर्ते व परिसरातील नागरिक यांच्या प्रमुख उपस्थितीत क्रांतिवीरांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
याप्रसंगी पुढे बोलताना आ. विजय वडेट्टीवार म्हणाले की,9 ऑगस्ट 1942 ला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी इंग्रजाविरोधात ‘चले जाव‘ चा नारा दिला. या ना-याने प्रभावित होवून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ‘झाड झडूले शस्त्र बनेंगे , भक्त बनेंगी सेना, पत्थर सारे बाॅंम्ब बनेंगे नाव लगेगी किनारे’ अशाप्रकारचे क्रांतीभजन गावून सळसळत्या रक्तक्रांतीला स्वातंत्र्यासाठी उत्तेजित करत प्रेरणा दिल्याने चिमुर, आष्टी, यावली, बेनोडा येथील स्वांतंत्र्य सेंनानींनी प्रेरीत होवून चिमुर येथे 16 ऑगस्ट 1942 ला नागपंचमीच्या दिवशी तिरंगा फडकविण्यासाठी आंदोलन केले. या आंदोलनामध्ये असंख्य स्वांतंत्र्य सेंनानी सहभागी झाले होते. या आंदोलनावर इंग्रज पोलीसामार्फत बेछूट गोळीबार झाल्याने यात 14 वर्षाचे तरुण क्रांतिकारी बालाजी रायपूरकर हे शहिद झाले. व असंख्य स्वांतंत्र्य सेंनानीं जखमी झाले या शहिदांची आठवण म्हणुन या क्षेत्रातून आमदार म्हणून निवडून आल्यानंतरच्या कार्यकाळात चिमुर येथील किल्यावर शहीद स्मारकाची उभारणी केलेली आहे. यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा पुर्णाकृती पुतळा, स्वांतंत्र्य सेंनानीं बालाजी रायपूरकर तसेच महात्मा ज्योतीबा फुले व सावित्रीबाई फुले यांची सुध्दा स्मारक उभारलेले आहे. चिमूरच्या क्रांतिवीरांनी देशासाठी दिलेले बलिदान व्यर्थ जाणार नाही तसेच खरे देशभक्तांचा स्वातंत्र्य लढ्यात असलेला सिंहाचा वाटा व श्रेय कुणालाही लाटू देणार नाही. ज्यांचा स्वातंत्र्याच्या लढ्यातील मात्र ही संबंध नाही ते आता देशभक्तीचे सोंग पांघरून जनतेला दिशाभूल करीत आहे. अशा भामट्यांपासून सावध राहावे ते यावेळेस ठणकावून म्हणाले.