वनविभागाकडून अजगर सापाला जीवनदान…

580

प्रितम गग्गुरी (अहेरी तालुका प्रतिनिधी)

अहेरी -: आज सकाळी ठिक ७:३० च्या दरम्यान नियत क्षेत्र मदिगूडम मधील शेत शिवारात एका अजगर सापाने दोन कोंबडे फस्त केले असताच यांची सूचना एका व्यक्तीने वनकर्मचारी यांना दूरध्वनी व्दारे माहिती दिले. माहिती मिळताच वनपरीक्षेत्र अधिकारी अहेरी यांच्या मार्गदर्शनाखाली नियत क्षेत्र वनरक्षक श्री.महेश खोब्रागडे व संयुक्त वनव्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. नारू नासनवार यांनी अजगर सापाला पकडून त्यांची तपासणी केली.

त्यानंतर खंड क्रमांक २३ मधील जंगलात जाऊन सुखरूप सोडण्यात आले. त्यामुळे तिथे शेत शिवारात काम करणाऱ्या व्यक्तींनी वनरक्षक व संयुक्त वनव्यवस्थापन समिती अध्यक्ष यांचा आभार मानले.