स्वराज्य फाउंडेशनमुळे मिळाली रुग्णाला जीवनदान

634

प्रितम गग्गुरी ( अहेरी तालुका प्रतिनिधी)

अहेरी :- काल तोडासा येथील राणू गावडे हे काही कामानिमित्त आलापल्ली ला आले होते काम आटोवून परत आपल्या गावी जात असताना आलापल्ली वरून तीन किलोमीटर अंतरावर मद्दीगुड्म येते त्यांच्या दुचाकी चे संतुलन बिघडून ते खाली पडले व त्यात ते गंभीर जखमी झाले.

हे बाब स्वराज्य फाउंडेशनचे सदस्य समया चिंतावार हे घटनास्थळी उपस्थित असल्यामुळे त्यांनी लगेच स्वराज्य फाउंडेशन च्या पदाधिकाऱ्यांना संपर्क केला व स्वराज्य फाउंडेशनचे पदाधिकारी यांनी स्वराज्य फाऊंडेशन ची रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी पोहोचले व त्यांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथे भरती करण्यात आले परत एकदा स्वराज्य फाउंडेशन ने एकाचे प्राण वाचविले