टायगर ग्रुपच्या सतर्कतेमुळे बैलपोळाच्या दिवशी गौ हत्या करणाऱ्यांच्या दुचाकी ताब्यात…

991

प्रितम गग्गुरी (अहेरी तालुका प्रतिनिधी)

आलापल्ली:- एकीकडे संपूर्ण भारत देश बैलपोळा सण उत्साहात साजरा करत असताना दुसरीकडे त्याच देशांमध्ये पोळ्याच्या पवित्र दिनी गाय बैलांची हत्या करत असल्याची धक्कादायक घटना आलापल्ली येथे बैलपोळा सणाच्या दिवशी समोर आली.

दि.२७ ऑगस्टच्या मध्यरात्री दोन वाजता टायगर ग्रुपला माहिती मिळाली की, आलापल्ली पासून पाच किलोमीटर अंतरावर जंगलात काही अज्ञात लोक गायींची कत्तल करत आहेत.

ही माहिती कळताच टायगर ग्रुपच्या सर्व सदस्यांना या विषयी सांगण्यात आले व सर्वांना सोबत घेऊन तात्काळ त्या घटनास्थळी जंगलाचे दिशने जायला निघाले. काही अंतरावर गेल्यावर त्या जंगल परिसरात बॅटरीचा प्रकाश दिसायला लागला सर्व सदस्य सतर्क झाले व सगळे त्या प्रकाशाचा दिशने हळूहळू चालायला लागले मात्र त्या गौ हत्या करणाऱ्या आरोपींना चाहूल लागली की कुणीतरी आमच्या दिशने येऊन राहीले आहे हे बघून सगळे आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. मात्र त्या ठिकाणी दोन दुचाकी व गायीचे मास सापडले.

या घटनेची माहिती अहेरी पोलीस ठाण्याला देण्यात आली. या घटनेविषयी अधिक तपास पोलीस प्रशासन करत आहे.