सुरजागड लोहप्रकल्पामुळे राष्ट्रीय महामार्ग ३५३ वर मधोमध ट्रक फसल्याने ट्रॅफिक जाम.. ५० हुन अधिक वाहने रस्त्यावर उभे

358

आल्लापल्ली :- सुरजागड प्रकल्प मध्ये खूप भर भराट मध्ये ट्रक चालू आहे सुरजागड प्रकल्प चालू असल्यामुळे सुरजागड वरून येणाऱ्या ट्रक मध्ये लोहखनिज भरून वाहतूक करत असल्यामुळे आल्लापल्ली मध्ये रोज रोज ट्रॅफिक जाम होत आहे तसेच आल्लापल्ली येथे धूळाचा वातावरण झाला आहे.

त्यामुळे स्थानिक व बाहेरून येणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे आणि धुळे चा वातावरण झाल्यामुळे रस्त्या लगत असलेले दुकानात धुळ जात असल्याने दुकानदाराचे नुकसान होत आहे. आणि या सुरजागड प्रकल्पामुळे दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत जात आहे.

त्याच प्रकारे आज दिनांक ३० ऑगस्ट सायंकाळी ४:०० वाजेच्या सुमारास आल्लापल्ली ते आष्टी राष्ट्रीय महामार्ग
क्रमांक 353 वर लबाणतांडा जवळ सुरजागड लोह वाहतूक करणारा ट्रक क्रमांक MH34-AV-2342 आणि MH33-T-1576 रस्त्याच्या कडेला फसल्याने ट्रॅफिक जॅम झालेली आहे. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांची रांग लागली आहे.
त्यामुळे ५० हुन अधिक वाहने त्याठिकाणी थांबलेले आहे. त्यामुळे प्रवास करणाऱ्यांना खूप त्रास भोगावा लागत आहे.