विकिभाऊ तोडसाम यांच्या वाढदिवसानिमित्त ५४ रक्तदात्यांनी केले रक्तदान…

629

प्रितम गग्गुरी(अहेरी तालुका प्रतिनिधी)

अहेरी: तालुक्यात रक्तदुत म्हणून ओळखले जाणारे, नेहमी समाजकार्यात अग्रेसर असणारे, स्वतः रक्तदान करून युवकांना प्रेरणा देणारे विकिभाऊ तोडसाम यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी स्वतः २८ वी वेळ रक्तदान केले.

तोडसाम यांच्या वाढदिवसानिमित्त SDH ब्लड बैंक येथे रक्तदान शिबिर घेऊन ५४ रक्तदातानी रक्तदान केले. समाज हितास सहकार्य केले. या शिबिरात एकूण ५४ लोकांनी रक्तदान करीत किष्टापुर, मेडपल्ली, कोत्तुर, वेल्गुर वेंकतरवपेठा येथील युवक व १ महिला यांनी रक्तदान केले.

या शिबिराचे शिबिरासाठी कृणाल सल्लम, किशोर अग्गुवार, संतोष एलमुले, मोहित नेताम यांनी केले सहकार्य केले. शिबिरास SDH रक्तपेढी चे इचार्ज सरिता वाघ, निखिल सर कोंडापर्ति आणि शिरीन जी यांचे सहकार्य लाभले.

*रक्तदान हेच जीवनदान* 🩸❤️