शाळेचा उंबरठा न ओलांडता ११९६ विद्यार्थ्यांनी गाठला चक तिसरीच्या वर्ग… विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान

874

बळीराम काळे, जिवती

जिवती(ता.प्र):तालुक्यातील कोरोना महामारीमुळे सर्वच विद्यार्थाचे शै्क्षणिकदृष्ट्या मोठे नुकसान झाले आहे.
कोरोना या संकटामुळे दोन वर्ष शाळा बंध असल्याने तालुक्यातील ११९६ विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी शाळा व शिक्षक न पाहताच थेट तिसरीच्या वर्ग गाठला.
परिणामी त्यातील अनेक विद्यार्थी यांना अक्षर ही ओळलखता येत नसल्याचे तालुक्यात दिसून येत आहे.
दोन वर्षांपूर्वी पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याची अशी परिस्थिती आहे.
कोरोणा काळात अभ्यास नव्हता त्यात मुलांना बाहेर खेळायला जाता येत नव्हते.म्हणून मुलांच्या हातात मोबाईल आला.मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांना मोबाईलचे व्यसन जडले असल्याने अनेक विद्यार्थी शाळेतून घरी आल्यावर अभ्यासाऐवजी मोबाईलवर खेळत असताना दिसत आहे.मुलांना मोबाईलचे लागलेले व्यसन कसे सोडवायचे,हा मोठा प्रश्न पालकवर्गांना पडला आहे.कोरोणामुळे सर्वच विद्यार्थ्याचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले असून,ते भरून काढण्यासाठी शिक्षकांना जबाबदारी घेऊन विषेश उपक्रम राबवून विद्यार्थ्याची गुणवत्ता वाढवावी.
यासाठी शिक्षवृंद यांनी प्रयत्न केले पाहिजेत.
कोरोनाचा पादुर्भाव कमी झाल्यामुळे या शैक्षणिक सत्रात सर्वत्र नियमित शाळा सुरू झाल्या आहेत.कोरोनामुळे दोन वर्षांपासून शाळा बंध असल्यामुळे तालुक्यातील विद्यार्थाचे शैक्षणिक नुकसान झाले.कोरोना साथी पूर्वी पहिल्या वर्गात १२१ जि. प.शाळेतील ९९३ व १० खाजगी शाळेतील २०३ अशा एकूण ११९६ विद्यार्थांच्या शाळा आणि शिक्षकांचा संपर्कच आला नाही.
कारण पाहिल्याचा विद्यार्थाचे तर वर्गच भरल नाहीत.
त्यामुळे त्यांना मागील दोन वर्षात शिक्षक,शाळा, पाटी,
खडू,फळा दिसलेच नाही.हे विद्यार्थी शिक्षनाविणाच पास होऊन तिसरीच्या वर्गात पोहचले आहेत. शैक्षणिक सत्र सुरू होऊन दोन ते अडीच महिण्याचा कालावधी होऊनही
मात्र विद्यार्थांना अक्षराची अजूनही ओळख झाली नसल्याचे चित्र तालुक्याच्या ठिकाणी दिसून येते आहे.