पदवीधर उमेदवार प्रा. अनिल डहाके प्रचारासाठी सायकलवर…

1265

प्रलय म्हशाखेत्री (चंद्रपुर जिल्हा प्रतिनिधी)

चंद्रपुर: गोंडवाना विद्यापीठ,गडचिरोली पदवीधर निवडणूक दि. 04/09/2022 ला होत आहे.यामध्ये तीन पॅनल निवडणुकीत सहभागी झाले आहे.पदवीधर गटातील उमेदवार प्रा.अनिल डहाके सेक्युलर परिवर्तन पॅनल कडून ओबीसी गटातून निवडणूक लढवत आहे.त्यांनी प्रचारासाठी चक्क सायकल फिरून प्रचार सुरु केला आहे.

शहरातील विविध भागात सायकलवर प्रवास करून निवडणुकीचा प्रचार करत असल्याने लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.विविध भागातून त्यांचं कौतुक होत आहे यापूर्वी त्यांनी ओबीसी समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी चंद्रपूर जिल्यात ओबीसी जनगणना सायकल यात्रा काढून 28दिवसात 2500किमी.प्रवास करून प्रबोधनाचे कार्य केले.तसेच ओबीसी मोर्च्यात सक्रिय राहून युवकांचे नेतृत्व केले.

विविध सामाजिक कार्यात अग्रेसर राहून सामाजिक प्रबोधनाचे कार्य करत असतात.पदवीधर निवडणुकीत ओबीसी गटातुन सेक्युलर पॅनल कडून निवडणूक लढवत असल्याने त्यांच्या पॅनल अधिक मजबूत स्थितीत आहे. त्यामुळे अतिशय चुरशीची लढत होतांना दिसत आहे.डॉ.आंबेडकर टीचर्स असो.,युवा सेना, ओबीसी सेवा संघ,शिक्षक भारती,प्रजासत्ताक शिक्षक संघ,तसेच विविध सामाजिक संघटना एकत्रित येऊन सेक्युलर परिवर्तन पॅनल च्या माध्यमातून निवडणूक लढवत आहे.विविध सामाजिक संघटनेचा सक्रिय पाठिंबा त्यांना मिळत आहे.

या सायकल प्रचार यात्रेत यावेळी त्यांच्या सोबत सतीश मालेकर,विलास माथनकर,विवेक बोरीकर, अनिकेत दुर्गे, प्रलय म्हशाखेत्री,विपुल देऊळकर, विशाल शेंडे, धम्मदीप भारशंकर, निखिल भडके,अतुल देऊळकर ,अरुण माळेकर,विनय धोबे, राहुल वीरूटकर, नामदेवराव मोरे , पुरुषोत्तम टोंगे , रवींद्र जेनेकर,सुहास पारखी ,निखिल जुनघरी, अमित बावणे, आयुष जाधव ,प्रणय जेनेकर ,सौरभ जेणेकर ,उपस्थित होते.