नांदगाव ग्रामपंचायतच्या महिला सरपंचाचा भर ग्रामसभेत उद्धटपणा…

1697

मुल: तालुक्यातील नांदगांव येथील ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभा आयोजित करण्यात आली. सदर सभेत एक वेगळाच प्रकार निदर्शनास आला. ग्रामपंचायतच्या सरपंच असलेल्या कु. हिमानी दशरथ वाकुडकर या फक्त आणि फक्त एकट्याच खुर्चीवर बसल्या. परंतु उपसरपंच सागर देऊरकर, ग्रामसेवक, पोलिस पाटील, स्वतःचे वडील दशरथ वाकुडकर, गावातील जेष्ठ नागरिक आणि सभेत उपस्थित लोकांना कोणत्याही सन्मान दिला नाही. पुढे जाऊन उपस्थित लोकांना समाधानकारक उत्तर न देता ‘ए तू चूप बसून राहशील तर रहा नाही तर घरी निघून जा’ असे उद्धटपणे आणि सरपंच पदाला न शोभणारे शब्द त्यांनी काढले. ही बाब अत्यंत धक्कादायक असून यावर गावकऱ्यांनी रोष व्यक्त केला आहे.

विशेष म्हणजे सरपंच हिमानी वाकुडकर स्वतःला उच्च शिक्षित ऍड म्हणवून घेतात. इन कॅमेरा भर ग्रामसभेत अशा उद्धटपणे बोलू शकतात तर मागे गावातील लोकांसोबत कशा बोलत असतील याचा विचार करावा आणि स्वतःची चूक झाकण्याकरीता सभेतील लोक गोंधळ करित आहे असे खोटे बोलून सरपंचांनी पोलिस वाल्यानं बोलुन घेतले. विद्यमान सरपंचाकडून गावातील लोकांवर संस्कार देण्याऐवजी लोकांकडून सरपंचावर बोलण्याचे संस्कार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. अशा तीव्र प्रतिक्रिया गावातून येत आहे.