श्याम म्हशाखेत्री (चंद्रपुर जिल्हा संपादक)
चंद्रपुर: अख्या महाराष्ट्रात गणरायाचे आगमन झाले. संपूर्ण महाराष्ट्रभर गणेश विसर्जनाची पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु चंद्रपूर महानगपालिकेतर्फे पठाणपुरा गेटच्या बाहेरील ईरई नदीवर कोणत्याही प्रकारची लाईटची व्यवस्था करण्यात आलेली नाही. ही सर्व माहिती इंडिया दस्तक न्यूज टीव्हीचे जिल्हा संपादक यांनी थेट घटनास्थळी जाऊन घेतली आहे.
काळ्याकुट्ट अंधारात गणेश भक्त आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यास येत आहे. परंतु चंद्रपूर महानगर पालिकेचे गणेश भक्त आपल्या भक्ती मध्ये ऐवढे मग्न झाले आहे की त्यांना विसर्जन स्थळी लाईटची पर्यायी व्यवस्था करायला वेळ मिळत नाही आहे. काळ्याकुट्ट अंधारात एखादी दुर्घटना घडली तर याला जिम्मेदार कोण? असा प्रश्न गणेशभक्तांना पडला आहे.