आगीत घर व किराणा दुकान जळून खाक…लाखो रुपयांचे नुकसान…

800

बळीराम काळे,जिवती

जिवती (ता.प्र.) : तालुक्यातील तलाठी साजा वणी (बु) अंतर्गत येत असलेल्या गुडशेला येथील शेतकरी शेरपुदीन शेख यांच्या घराला आज सकाळी ११:०० वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. आगीने रौद्र रूप धारण करत घराला लागून असलेले त्यांचे किराणा दुकानालाही कवेत घेऊन घरातील संसारउपयोगी साहित्य तसेच दुकानातील साहित्य जळून खाक झाले आहे.

शेजारील नागरिकांनी जमा होऊन आगीला आटोक्यात आणले. शेरपुदीन शेख यांच्या घराचे व त्यांच्या किराणा दुकानाचे जवळपास एक लाखाचे नुकसान झाल्याचे बोलल्या जात आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थीतीतुन कसाबसा कुटुंबाचा गाढा हाकत असताना अचानक झालेल्या या घटनेने कुटुंबाचे मनोबल खचलेले आहे. आगीत झालेल्या नुकसानीचा शासनाने सदर कुटुंबाला तातडीने मदत करण्याची मागणी गावकऱ्यांतून होत आहे.

कोट – आज अचानक शेरपुदीन शेख, गुडशेला यांच्या घराला व किराणा दुकानाला लागलेल्या आगीचा पंचासमक्ष मोका पंचनामा करून सदर अहवाल तहसील कार्यालय जिवती येथे सादर करण्यात आला.
– श्री. निशांत मालेकर, तलाठी, तलाठी साजा, वणी (बु)