एनएमएमएस परीक्षेत बालाजी हायस्कूलचे तिन विद्यार्थी उत्तीर्ण

813

बळीराम काळे,जिवती

जिवती (ता.प्र) : राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना ( National Means Cum-Merit Scholarship,NMMS) २०२२ च्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातल्या विद्यार्थ्यांची आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा १९ जून २०२२ रोजी घेण्यात आली होती. शिष्यवृत्तीस पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची यातून निवड करण्यात येते. २००७-०८ पासून इयत्ता आठवीच्या अखेर आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुद्धिमान विद्यार्थ्याना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करण्यात येते.
त्या विद्यार्थ्यांना परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळते.
या शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत अतिदुर्गम, आदिवासी बहुल व नक्षलग्रस्त भाग असलेल्या तालुक्यातील जिवती येथील बालाजी हायस्कूल या शाळेतील विद्यार्थी प्रतीक्षा किसन दुधाटे, पूनम संजय गिरमाजी, रेश्मा गोपीनाथ चव्हाण या तीन विद्यार्थ्यांची या परीक्षेत यश मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.
या प्रज्ञावान विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवृत्तीच्या स्वरूपात आर्थिक सहाय्य करण्यात येते. सदर शिष्यवृत्ती बारावी पर्यंत मिळत असते.
सन २०१७-१८ पासून शिष्यवृत्तीचा दरमहा एक हजार याप्रमाणे वार्षिक बारा हजार दिले जातात. इयत्ता आठवीतील आर्थिक दुर्बल घटकातील ज्या पालकांचे उत्पन्न रु.१,५०,००० पेक्षा कमी आहे व जे विद्यार्थी अनुदानित शाळेत असतात त्या विद्यार्थ्यांना परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे शिष्यवृत्ती दिली जाते. शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व संस्थेतील सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व शाळेतील शिक्षकांनी अभ्यास गटाच्या माध्यमातून प्रभावीपणे अध्ययन कार्य केले, विद्यार्थी व पालकांनी केलेल्या सहकार्यामुळे बालाजी हायस्कूल शाळेची शैक्षणिक गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे.