सिद्धार्थ दहागावकर (गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी)
गोंडपिपरी: तालुक्यातील सकमुर(चेकबापूर) गावामध्ये दूषित पाण्यामुळे गेल्या काही दिवसांपासून तापाची साथ सुरू आहे. परंतु या बाबीकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले आहे.
सकमुर गावाला पाणीपुरवठा हा नळाच्या माध्यमातून केला जातो. परंतु पावसाळा सुरू असल्याने गेल्या काही दिवसांपासून पिण्याचे पाणी दूषित येत आहे. त्यामुळे गावातील बऱ्याच नागरिकांना तापाने ग्रासलेले आहे. या बाबीची दखल घेऊन लवकरात लवकर शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने उपाययोजना करावी अशी गावकऱ्यांनी विनंती केली आहे.