टायगर ग्रुप आणि राजमुद्रा फाऊंडेशनच्या सतर्कतेमुळे ५० गोवंश सुखरूप…

472

प्रितम गग्गुरी (अहेरी तालुका प्रतिनिधी)

एटापल्ली: तालुक्यातील कसनसूर मार्गाने दिनांक ९ सप्टेंबर ला पहाटे ३:०० च्या दरम्यान एका ट्रकमध्ये गोवंश तस्करी करत असल्याची माहिती राजमुद्रा फाऊंडेशनच्या सदस्यांना मिळाली. माहिती मिळताच राजमुद्रा फाउंडेशनचे सदस्य एटापल्ली येथे त्या ट्रक ला अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या ट्रक चालकानी त्यांच्याच अंगावर ट्रक चढवण्याचा प्रयत्न केला आणि ते ट्रक घेऊन पळ काढला.

या घटनेबाबत माहिती राजमुद्रा फाउंडेशनच्या सदस्यांनी आल्लापल्ली येथील टायगर ग्रुपला दिली. टायगर ग्रुपच्या सदस्यांनी आलापल्ली-एटापल्ली रोडवर सापडा रचून आपली दुचाकी रस्त्याच्या मधोमध लावून त्या ट्रकला थांबवले. मात्र चालक आपला ट्रक सोडून घटनास्थळावरून पसार झाला.

त्या गाडीमध्ये एकूण ५० गोवंश होते. या घटनेबाबत माहिती पोलीस प्रशासनाला देण्यात आली. त्या ५० गौवंशना चंद्रपूर येथील राधे कृष्ण गौशाला (प्यार रेस्क्यू शेलटर) येथे पोलीस कर्मचारी व टायगर ग्रूपचे पदाधिकारी स्वतः सोबत घेऊन गेले व त्या ५० गौवंशाना सुखरूप पणे गौशालेत सोडण्यात आले.