वन्यप्राण्यांच्या कळपाने केले उभ्या शेतीला जमीनदोस्त…

581

नितिन पवार (जिवती तालुका ग्रामीण प्रतिनिधी)

जिवती: तालुक्यातील मौजा पिट्टीगुडा नं 1 येथील शेतकरी रघुनाथ किसन पवार यांचे रहद्दारीच्या रस्त्याला लागून असलेले ज्वारीचे शेतीचे खूप जास्त प्रमाणात नुकसान वन्यप्राण्यांनी दिनांक 11/09/2022 च्या पहाटे च्या सुमारास धुमाकूळ मजावून शेतमालाला जमीनदोस्त केले. सदर घटनेने शेतकरी खूप जास्त चिंतेत पडले आहे. त्याच्या मानसिकतेवर खूप जास्त विपरित् परिणाम झालेले दिसून येत आहे. दिवस रात्र शेतीची रखवाली करून सुद्धा वन्यप्राणी धुमाकूळ घालत आहेत.

सदर शेतकऱ्याचे झालेले शेतमालाच्या नुकसानाची भरपाई संबंधित विभागाने लवकरात लवकर करून शेतकरी रघुनाथ पवार यांचे आधार वाढवावे अन्यथा शेतकरी समोर कोणते पाऊल उचलेल हे सांगणे अवघड आहे.