हृदयाला छिद्र अशा दुर्धर आजारग्रस्त जिल्ह्यातील रुग्णांनी २२ सप्टेंबरपर्यंत अर्ज करावे… विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने मोफत शस्त्रक्रिया…

533

वैभव आत्राम (सिंदेवाही तालुका प्रतिनिधी)

चंद्रपूर : जन्मताच हृदयाला छिद्र अशा दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील रुग्णाच्या पालकांनी २२ सप्टेंबरपर्यंत माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने होत असलेल्या हृदयाला छिद्र या दुर्धर आजाराच्या शस्त्रक्रियेसाठी काँग्रेस जनसंपर्क कार्यालय ब्रह्मपुरी ,सावली ,सिंदेवाही येथे अर्ज करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

हृदयाला छिद्र अशा दुर्धर आजारग्रस्तांचे अर्ज २२ सप्टेंबरपर्यंत प्राप्त झाल्यानंतर त्यांना २५ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता काँग्रेस कमिटी कार्यालयात ब्रम्हपुरी येथुन तपासणी करून त्यांना नागपूर येथे नेण्यासाठी आ. विजय वडेट्टीवार यांच्याकडून मोफत वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

आ. विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकारातून नागपूर येथे रुग्णांची मुंबई येथील तज्ज्ञ डॉक्टरकडून तपासणी केल्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी मुंबई येथे नेण्यात येणार आहे. जन्मताच हृदयाला छिद्र या हृदयाच्या दुर्धर आजाराने अनेक बालके ग्रस्त आहेत. तर कुटुंबाची आर्थिक परिस्थिती, महागडा उपचार, तद्वतच मोठ्या शहरात राहून उपचार करून घेण्यास येणाऱ्या अडचणी हे ग्रामीण पातळीवरील रुग्ण नातेवाईकांना परवडण्यासारखे नाही. याची माहिती मिळताच राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते, आ. विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकारातून चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील १ ते १० या वयोगटातील हृदय संबंधी आजारग्रस्त बालकांची जुपिटर हॉस्पिटल ठाणे (मुंबई) येथे मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

शस्त्रक्रिया उपक्रमात आजारग्रस्त रुग्ण व सोबत एक नातेवाईकांना मुंबई गाठण्यासाठी विमान प्रवास, राहण्याची व्यवस्था, शस्त्रक्रिया व उपचार खर्च, या सर्व सुविधा मोफत पुरविल्या जाणार आहे. या उपक्रमाचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा, तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील जे आजारग्रस्त रुग्ण आहे. त्या रुग्णांना ब्रह्मपुरी येथून नागपूर येथे नेण्याकरिता मोफत प्रवास सुविधा करण्यात आलेली असून चंद्रपूर जिल्ह्यातील रुग्णांनी सकाळी ८ वाजता नातेवाईकांनी रुग्णाला सोबत घेऊन तालुका काँग्रेस कमिटी कार्यालय ब्रह्मपुरी येथे नियोजित वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आलेले आहे.