शाळेतील विद्यार्थ्यांनी बांधला वनराई बंधारा

410

 

तालुका: (ता.प्र.) तालुक्यातील पालडोह येथील ३६५ दिवस चालणाऱ्या जिल्हा परिषद ऊच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी शिषकांच्या मार्गदर्शनात बांधला वनराई बंधारा.
“पाणी अडवा पाणी जिरवा” हा मलमंत्र अवलंबत शाळकरी मुले व मुली यांनी पुढाकार घेऊन,विद्यार्थांच्या सहकार्याने वनराई बंधारा बांधून समाजात सामाजिक संदेश दिला.तर यावेळी प्रिया मालेकर उपस्थित होत्या तर शाळेतील शिक्षण प्रेमी शेषराव देवकते,जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पालडोह चे मुख्यध्यापक राजेंद्र परतेकी,विद्यार्थ्यांनी यावेळी वनराई बंधारा बांधला.त्यामुळे परिसरातील पाण्याची पातळी वाढणार असून,तसेच जनावरांना देखील पाणी पिण्यासाठी मदतगार होइल.विद्यार्थांच्या या सहकार्याने वनराई बंधारा बांधल्यामुळे या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.