अरेरे! एकाच दुकानावर चोरट्यांची सात वेळा नजर

557

 

श्याम म्हाशाखेत्री (चंद्रपुर जिल्हा संपादक)

चंद्रपुर: शहर पोलीस स्टेशन पासून अगदी 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या राजनगर सहारा पार्क रोड वर असलेल्या दुकानात रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची धक्कादायक बातमी काल रात्रीच्या सुमारास घडली. यामध्ये चोरट्यांनी दुकान फोडून दुकानातील १५ हजाराचा ऐवज लंपास जेल. एकच दुकान तब्बल सात वेळा फोडून चोरट्यांनी रेकॉर्ड ब्रेक केला असे दुकान मालक यांचे कडून कळले आहे.

या अगोदर सुध्दा राजनगर कॉलनी येथे लाखो रुपयांची चोरी झाली होती. या चोरीच्या घटना मुळे तेथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या चोरीच्या घटना मुळे शहर पोलीस स्टेशन यांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी स्थानिक नागरिकांचे मागणी आहे…