जोगीसाखरा येथील भव्य व्हाॅलिबाल स्पर्धत लाॅयस मेटल संघ ठरला प्रथम पुरस्काराचा मानकरी…

605

जोगीसाखरा -आरमोरी तालुक्यातील जोगी साखरा येथे सध्या तरुणाई ची लगबग मैदानावर व्हालिबाॅल खेळताना पहायला मिळते. गेल्या १२ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर पर्यंत जोगीसाखरा येथे शिवाजी स्पोर्टींग ब्लब च्या वतीने जवाहरलाल नेहरू महाविद्यालयाच्या मैदानावर दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भव्य भव्य व्हालिबाॅल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. युवकांमधली खेळण्यातील प्रगल्ब शक्ती लक्षात घेता तसेच रोजच्या छंद म्हणून व्हाॅलिबाॅल सारखा खेळघ खेळताना नवनवीन खेळाडू तयार व्हावेत आणि त्यातूनच राज्य – राष्ट्रीय स्तरावर आपल्या कौशल्याच्या बळावर मजल मारावी व खेळाडू म्हणून नावलौकिक मिळवावा.हा उद्देश बाळगून स्पर्धेचे आयोजन केले जाते. यावर्षी यात एकून‌ २० संघानी सहभाग घेतला होता.स्पर्धेत प्रथम पुरस्काराचा मानकरी लाॅयस मेटल संघ सुरजागड,द्वितीय क्रमांक जय शिवाजी स्पोर्टींग ब्लब व तृतीय क्रमांक मुलचेरा तालुक्यातील आबंटपल्ली संघाने मिळवला.निरोप समारंभीय कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आरमोरी पोलिस स्टेशन चे ठाणेदार मनोज जी काळबांधे, मा.आमदार हरिराम जी वरखडे. तसेच इतर मान्यवर मंचावर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रलोभ कोल्हे तर आभार प्रदर्शन समीर मोहुर्ले यांनी मांडले . जय शिवाजी स्पोर्टींग ब्लब चे सदस्यगण आणि गावकरी मंडळींनी स्पर्धेला उत्स्फूर्तपणे सहकार्य केले.