माराईपाटणच्या “खरतड’ रस्थाअभावी नागरिकांचा व शालेय विद्यार्थी यांचा होतोय मनस्ताप… दिवाळी लोटूनही माराईपाटण रस्त्याचे काम नाही

544

बळीराम काळे, जिवती

जिवती : (ता.प्र.) तालुक्या अंतर्गत टेकामांडवा ते माराईपाटण रस्त्याचे काम ४ ते ५ महिन्याचा कालावधी लोटूनही किंवा दिवाळी होऊनही आजपोवतो माराईपाटण रस्त्याचे डांबरीकरण चे काम चालू केलेले नाही. त्यामुळे माराईपाटण,भारी ते बाबापुर मार्गे चालणारी बस सेवा ही रस्त्यावीना बंध झाल्यामुळे शालेय विद्यार्थी व प्रवासी यांची गैरसोय होत असतानाची दिसून येत आहे.शालेय शिक्षण घेत असलेले विद्यार्थी यांना ४ किमी.अंतर पाई चालत जाऊन शाळा करावी लागते अशी प्रस्थिती आहे.
तेथील नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे,आरोग्य विषयी मोठी समस्या निर्माण होत आहे.इमर्जन्सी पेशंट दवाखान्यात घेऊन जायचा म्हणजे १०किमी अंतरावर उपचारासाठी घेऊन जावे लागत आहे.
रस्त्याची अशी अवस्था आहे की, अत्यंत कठीण परिस्थितीत वाहन चालवावी लागते.म्हणून प्रधानमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत गृह मंत्रालयाकडून मागणी केल्यानुसार केंद्र शासनाच्या ग्राम विकास विभाग,नवी दिली रस्ते जोडणी व “गाव तिथे रस्ता”असा उपक्रम आहे.पण ते होताना दिसत नाही.जिथे लोकांची वस्थी आहे तिथे त्यांना सर्व सोई सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शासन प्रयत्नशील असते.पण माराईपाटण येथे अंदाजे ३० ते ४० वर्षानंतर डांबरी सडकचे काम हे, “गुप्ता कंट्रशन नागपूर कंपनी” या ठेकेदाराच्या माध्यमतून रस्त्याचे काम चालू असून ते पुर्णपने निकृष्ट दर्जाचे होत आहे. परंतु हली तीन महिन्यापासून सतत पाऊस मोठ्या प्रमाणात पडत असल्यामुळे रस्त्यावरील पूर्णपणे माती मुरूम वाहून गेली आहे.अती पावसामुळे घाटात मोठी नाली पडलेली दिसून येत आहे, व रस्त्यावर उघडी गिट्टी पडलेले पाहवयास मिळत आहे.मोठी नाली पडलेली दिसून येत आहे.
त्यामुळे दुचाकी वाहन धारकांना मार्ग काढण्याकरिता जीव मुठीत घेऊन तारेवरची कसरत करावी लागत आहे.
रात्रीच्या वेळेस दुचाकी चालवणे, पाई चालणे म्हणजे खूपच घातक बनले आहे.
या रस्त्याच्या दुर्दशामुळे घसरून पडले आहेत.परंतु सुदैवाने जीवित हानी झाली नाही,पण अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.प्रशासनाणी लक्ष द्यावे व रस्त्याचे काम त्वरित चालू करून पुनःछ राजुरा अगारची बस सेवा,दुचाकी, फोर व्हिलर सेवा सुरळीत चालू होईल व परिसरातील विद्यार्थी व नागरिक यांची गैरसोय होणार नाही. असे नागरिकांचे म्हणने आहे.येथील नागरिक व परिसरातील नागरिक रस्त्याच्या दुर्दशामुळे वैतागले आहेत. त्वरित माराईपाटण रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग चंद्रपूर तसेच सार्वजनिक बांधकाम उपविभाग जिवती यांनी कटाक्षाने लक्ष देऊन त्वरीत टेकामांडवा फाटा ते माराईपाटण रस्त्याचे काम सुरू केले नाही, तर परिसरातील नागरीक रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा दिला आहे.