अखेर महागाव-सुभासनगर पर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरु.. सामाजिक कार्यकर्ता संजय अलोने यांच्या प्रयत्नांना यश.

536

प्रितम गग्गुरी(उपसंपादक)

अहेरी :- गेल्या अनेक महिन्यांपासून अहेरी – महागाव – सुभाषनगर पर्यंतचा रस्ता पूर्ण पणे उखडून जाऊन ठीक ठिकाणी मोठं मोठे जीवघेणे खड्डे पडून रस्ता खराब झाल्याने महागाव बु, महागाव खु, वांगेपल्ली, गेर्रा, मुत्तापूर, आपापली, चितलपेठ, बोरी, राजपूर पॅच आदी गावातील नागरिकांना अहेरी मुख्यालयी येण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत होते.

गेल्या अनेक महिन्यांपासून नागरिकांना होणाऱ्या त्रास दूर करण्यासाठी येथील सामाजिक कार्यकर्ता संजय अलोने यांनी रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे म्हणून अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदनाद्वारे मागणी केली. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून डांबरीकरनाला सुरुवात झाली आहे.

अहेरी ते सुभाषनगर पर्यंत एकूण १२ किलोमीटर च रस्ता आहे, या मध्ये अहेरी पासून ते महागाव पर्यंत ६ किलोमीटर अंतरच रस्ता डागडुगी आणि महागाव पासून ते सुभाषनगर ६ किलोमीटर रस्ता डांबरीकरनाचे काम यंग कंट्रक्शन कंपनी चंद्रपुर करत असल्याची माहिती देण्यात आली आहे. या कामामुळे नागरिकांना दिलासा मिळाल्याने असून संजय अलोणे यांचे नागरिकांनी आभार व्यक्त केले आहे.

या मार्गाने विद्यमान आमदार तथा माजी राज्यमंत्री, दोन माजी आमदार व माजी पालकमंत्री तसेच माजी दोन दोन जिल्हा परिषद अध्यक्ष आदी जिल्हा मुख्यालयी जाण्यासाठी याच मार्गाने प्रवास करीत असतात, मात्र त्यांचा दुर्लक्षित पणाने रस्त्यांची दुरवस्था झाल्याने अनेक अपघात होउन अनेकांना किरकोळ. जखमा झाल्याचे घटना घडल्या आहेत, तरी देखील कोणत्याही नेत्याने या मार्गा संदर्भात पाठपुरावा न केल्याने अखेर ग्रामस्थांच्या सहकार्याने सामाजिक कार्यकर्ते संजय अलोने यांच्या प्रयत्नाने रस्ताचे काम सुरु झाले.