लघवीचा घाणेरडा वास येतोय? तर होऊ शकतो ‘या गंभीर’ आजाराचा धोका…

812

अनेकदा लघवी करताना तुमच्या लघवीचा रंग खुपच पिवळा असतो. अथवा लघवी केल्यानंतर तुम्हाला जळजळ किंवा दुर्गंधी येण्यासारख्या समस्या जाणवतात. या समस्या काही साध्यासुध्या नाही आहेत. या समस्या तुमच्या शरीरात अनेक आजारांना आमंत्रण देणाऱ्या ठरू शकतात. जर अशी समस्या जाणवत असेल तर तुम्हाला या गंभीर आजाराचा धोका आहे. हे आजार कोणते आहेत, ते जाणून घेऊय़ात.

‘या’ आजारांचा धोका

यूटीआय: यूटीआयमध्ये तुम्हाला लघवीच्या वासासोबतच लघवीमध्ये जळजळ होणे, लघवीमधून रक्त येणे आणि वारंवार लघवी होणे अशा समस्या जाणवतात.जर या समस्या येत असतील तर यूटीआयची तपासणी करणे आवश्यक आहे.

मधुमेह: डायबिटीज असलेल्या रूग्णांच्या लघवीला कुजलेल्या गोड फळांसारखा वास येतो. कारण लघवीत ग्लुकोजचे प्रमाण जास्त असते. या वासापासून मुक्त होण्यासाठी तुम्हाला तुमचा मधुमेह नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे.

लिव्हर डिजीज: जर तुमच्या लघवीतून अमोनिया सारखा वास येत असेल तर ते लिव्हरच्या आजाराचे संकेत आहेत.हा आजार झाला असेल तर तुमचे त्वचा आणि डोळे पिवळे पडतात, पोटात वेदना होतात, मळमळ,उलट्या आणि पोटात सूज येणे यासारख्या समस्या जाणवतात.

गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ब्लॅडर फिस्टुला: या आजारात लघवीला विष्ठेसारखा वास येऊ शकतो. गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ब्लॅडर फिस्टुलामुळे वारंवार लघवी मार्गात संसर्ग होऊ शकतो किंवा लघवी मार्गातून गॅस निघून जाण्याची समस्या उद्भवू शकते.

मेपल सिरप यूरिन डिजीज: मॅपल सिरप युरिन रोग एक दुर्मिळ अनुवांशिक स्थिती आहे. याचे निदान बालपणातच होते. यामुळे ग्रस्त असलेल्या मुलांच्या लघवीतून तीव्र दुर्गंधी येते. या आजाराच्या इतर लक्षणांमध्ये चक्कर येणे, निद्रानाश, खराब आहार, वजन कमी होणे आणि चिडचिडेपणा यांचा समावेश होतो.