शासकीय कार्यालयात महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस गडचिरोली पोलिसांनी केली अटक

873

प्रितम म.गग्गुरी (उपसंपादक)

गडचिरोली : येथील जिल्हा परीषद कार्यालयात महीलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस गडचिरोली पोलीसांनी केली अटक आहे. प्राप्त माहितीनुसार पिडीत महीला हि जिल्हा परीषद गडचिरोली येथे नौकरीवर असुन त्याच विभागात मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी म्हणुन कर्तव्यावर असलेले आरोपी ओंकार रामचंद्र अंबपकर रा. गुलमोहर कॉलोनी गडचिरोली हा कोणत्या कोणत्या कारणावरुन त्याचे कार्यालयात पिडीतेचा नेहमी विनयभंग करीत होता.

१६ नोव्हेंबर  २०२२ ते २० नोव्हेंबर २०२२ रोजी पर्यत पिडीतेस लेझर काढण्यासाठी चार पाच वेळा कॅबिनमध्ये बोलाविले आणी तिच्या असहयतेचा फायदा घेवुन विनयभंग करीत होता अशा पिडीतेच्या तक्रार वरुन पोस्टे गडचिरोली येथे आरोपी नामे ओंकार अंबपकर रा.गुलमोहर कॉलोनी गडचिरोली यांचे विरुध्द विवीध कलमान्वये व अनु.जा.ज. अत्या. प्रति अधिनीयम प्रमाणे गुन्हा नोंद करुन तपासात घेतला.
सदर आरोपीला गडचिरोली पोलीसांनी तात्काळ अटक करुन पुढील तपास गडचिरोली शहर पोलीस ठाणे करीत आहे.

कोणता गुन्हा केल्यास कोणतं कलम?

भारतीय दंड संहितेत कलम 349 ते 358 हे विनयभंग गुन्ह्याशी संबंधित आहे. विनयभंगाच्या प्रकारावरुन संबंधित कलम पोलिसांकडून संशयीत आरोपीवर लावलं जातं. स्त्रियांचं विनयभंगापासून संरक्षण करण्याकरता या कलमांची तरतूद करण्यात आली होती. स्त्रियांच्या हितासाठी या कायद्याची निर्मिती करण्यात आली होती. अशांविरोधात स्त्रियांना दाद मागता यावी, यासाठी कायद्याची मदत घेतली जाते.

Reels

कलम 354 : एखाद्या स्त्रीला लाज वाटावी किंवा आक्षेपार्ह वाटावी अशा स्वरुपाची जबरदस्ती केल्यास कलम 354 अन्वये कारवाई केली जाऊ शकते. हा गुन्हा सिद्ध झाल्यास तीन वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते. शिवाय दंडही आकारला जाऊ शकतो. दुसऱ्यावेळी या गुन्ह्यात दोषी आढळल्यात शिक्षेत पाच वर्षांपर्यंत वाढही होऊ शकते.

कलम 349 – एखाद्या स्त्रीवर जबरदस्ती केली गेली, तर कलम 349 नुसार गुन्हा दाखल करता येऊ शकतो.

कलम 350 – गुन्हा करण्याच्या हेतून एखाद्या व्यक्तीने महिलेच्या परवानगीशिवाय तिच्यावर जबरदस्ती केली तर कलम 350 नुसार कारवाई केली जाऊ शकते.

कलम 351 – शब्दांसोबत शारीरिक हावभाव करत एखाद्या स्त्रिला लज्जा वाटावी, असं बोलणं किंवा कृती करणंही विनयभंग मानला जातो. त्यानुसार कलम 351 अन्वये कारवाई केली जाऊ शकते. वरील गुन्ह्यात 3 महिने कारावास आणि 100 रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते.

कलम 355 : एखाद्या व्यक्तीचा अपमान करण्याच्या हेतून हल्ला करणं किंवा धमकी देणं