ग्रामीण कलाकाराचा खुशाल लोडे कडून सत्कार

476

 

तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेला सायखेडा या गावच भागेश ऊध्दवजी टेंभुर्ने ह्या युवकाने 4 नोव्हेंबरला प्रदर्शित झालेल्या पल्याड मराठी चित्रपटात छोटीशी भूमिका साकारली आहे.परिस्थिती गरिबीची, वडील टेलरिंगचा व्यवसाय करून 5 मुलांना उच्च शिक्षण देऊन भागेश ला आरोग्य विभागात नोकरी लावली, परंतु त्याच्या छंद न्यारा होता तो लहान पनापासून हुन्नरी होता, त्याला चित्रपटात काम करण्याचा मोह आवरता आला नाही त्याला संधी लाभली त्या संधीचा सोन करत मेहनतीने आणि जीद्दीने चित्रपटातील भमिका उत्तम प्रकारे साकारून सावली तालुक्याची आणि सायखेडा गावची मान उंच केली.
या परिसराचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक *श्री खुशाल लोडे* यांनी पालेबारसा येथे आहुती नाटकाच्या प्रयोगाचे वेळी भागेश च्या प्रेरणादायी, आदर्श वडिलाची आठवण म्हणून स्व.ऊध्दव आकोजी टेंभुर्णे यांची प्रतिमास्वरुप भेट देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी सावली महिला काँ. च्या अध्यक्षा सौ उषाताई भोयर, सावली ता. काँ. चे अध्यक्ष श्री नितिन गोहणे, प्रभाकर भोयर, प्रा.लोखंडे सर संदिपभाऊ कारंमवार, यांच्या उपस्थिती सत्कार करण्यात आला.