अहेरी तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानात राशन उपलब्ध करा…. सामजिक कार्यकर्ता संजय अलोणे सह गावकऱ्यांनी जिल्हा पुरवठा अधिका-याकडे केली मागणी..

357

प्रितम गग्गुरी(उपसंपादक)

अहेरी – गेल्या तीन महिन्यांपासून तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानात राशन उपलब्ध न झाल्याने राशन कार्ड धारकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची माहिती निदर्शनास येताच येथील सामाजिक कार्यकर्ते संजय अलोने यांनी गावकऱ्यांच्या सहका-याने अप्पर जिल्हाधिकारी यांच्या मार्फत जिल्हा पुरवठा अधिकारी यांना निवेदन देऊन राशन लवकरात लवकर उपलब्ध करून राशन कार्ड धारकांना वाटप करण्याची मागणी केली आहे.

निवेदनात म्हटले कि, राज्यातील दारिद्र्यरेषेखालील आणि दूर्गम भागातील पात्र कुटुंबांना निवडक जीवनावश्यक वस्तू सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध करुन देण्यासाठी सार्वजनिक वितरण व्यवस्था हे एक माध्यम आहे. गेल्या सप्टेंबर, ऑक्टोंबर, नोव्हेंबर व डिसेंबर 2022 या चार महिन्यात स्वस्त धान्य दुकानात राशन उपलब्ध न झाल्याने दारिद्रयारेषाखालील येणा-या राशन कार्ड धारकांना राशन उपलब्ध न झाल्याने नाहक त्रास सहन करावा लागल आहे. त्यामुळे समस्त नागरिकांची समस्या लक्षात घेता लवकरात लवकर राशन स्वस्त धान्य दुकानात राशन उपलब्ध करुन देण्यात यावे जेणे करुन दारिद्रयारेषाखाली येणा-या नागरिकांना व निराधार राशन कार्ड धारकांना कौटुंबिक, मानसिक त्रास होता कामा नये.

अंत्योदय अन्न योजनामधे राशन कार्ड धारकांना 30 किलो तांदुळ, गहु 5 किलो आणि 1 किलो साखर आणि प्राधान्य योजना अंतर्गत 4 किलो तांदुळ, गहु 1 किलो अशा प्रमाणे मिळत आहे. त्यामुळे निराधार नागरिकांना मोठ्या प्रमाणात आधार होत आहे. मात्र राशन उपलब्ध न झाल्याने अनेक कुटंबाला उपाशी पोटी राहण्याची वेळ निर्माण झाली आहे. सदर नागरिकांची समस्या लक्षात घेऊन लवकरात लवकर वरीष्ठांशी संपर्क साधुन राशन उपलब्ध करुन देण्यात यावे. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय अलोने यांनी अप्पर जिल्हाधिकारी यांच्या मार्फत जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

यावेळी निवेदन देतांना महागाव बुजुर्ग गावातील नारायण गोंगले, गजानन करमे, रमेश अलोणे, सदाशिव ;करमे. सुरेश वेलादी, मल्लेश गोंगले, दशिवकुमार जंगम, राजेंद्र गजभिये, चिन्ना पानेम, पुरुषोत्तम गर्गम, मंगेश वेलादीमनोहर अलने सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.