महाआरोग्य व रक्तदान शिबिराच्या आयोजनातून माजी मंत्री वडेट्टीवार यांचा वाढदिवस साजरा… ब्रम्हपुरी, सिंदेवाही, सावली तालुक्यांत आयोजन…

337

चंद्रपूर: तळागाळातील जनतेच्या सेवेसाठी अविरत झटणारे, मानवता हाच खरा धर्म मानून राजकारणापेक्षा समाजकारणाचा वसा जोपासत जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा असा दृढ संकल्प मनी बाळगणारे राज्यांचे माजी कॅबिनेट मंत्री काँग्रेस नेते तथा आमदार विजय वडेट्टीवार यांच्या वाढदिसानिमित्त आज ब्रम्हपुरी, सावली सिंदेवाही, तालुक्यासह संपुर्ण चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात महा आरोग्य शिबीर, रक्तदान शिबिर, तसेच रुग्णसेवे संबंधीचे उपक्रम राबवून साजरा करण्यात आला.

राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री काँग्रेस नेते तथा आमदार विजय वडेट्टीवार यांचा आज वाढदिवस. या निमीत्ताने ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील ब्रम्हपुरी सह सावली, सिंदेवाही येथील तालुका काँग्रेस कमिटी च्यावतीने महा आरोग्य तपासणी शिबीर, तसेच महा रक्तदान शिबिर, रुग्णांना फळे वाटप सोबतच गरजूंना विवीध साहित्य वाटप, यासह अनेक स्पर्धांचे आयोजन करून समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात आले.आज पार पडलेल्या महा आरोग्य तपासणी शिबीराचा हजारोंच्या संख्येने सहभागी होऊन नागरिकांनी लाभ घेतला. तर शेकडो रक्तदात्यांनीं रक्तदान करून सामजिक कर्तव्य बजावले. या प्रसंगी कार्यक्रमात मार्गदर्शन पर बोलतांना माजी मंत्रीआ. विजय वडेट्टीवार म्हणाले की, मानवाचा जन्म केवळ आर्थिक विकास साधून, स्वार्थ व उच्च पदावर जाण्यासाठीच नसून समाजाचे देणे म्हणुन समाज उपयोगी कार्य हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे. माणूस म्हणुन माणसाच्या उपयोगी पडणार नसणार तर मानव जन्म सार्थक ठरत नाही. वाढदिवस हे निमीत्त जरी असेल तरी माञ ही माझ्यासाठी जनसेवेची फार मोठी संधी आहे. असे प्रतिपादन त्यांनीं यावेळी केले. याप्रसंगी विवीध स्तरावरून शुभेच्छांचा वर्षावाचा स्वीकार करत नम्रतापूर्वक माजी मंत्री वडेट्टीवार शुभेच्छुक व हितचिंतकांचे आभार मानले.