माजी कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या वाढदिवसानिमित्त ब्लॅंकेट व फळवाटप

441

चंद्रपूर: राज्याचे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त शहरातील दाताळा रोड वरील दिव्यांग महिलाश्रम इथे चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटी (ग्रामीण) व चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेस कमिटी (ग्रामीण) यांच्या संयुक्त विद्यमाने ब्लॅंकेट व फळ वितरित करण्यात आले.

यावेळी चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष प्रकाश देवतळे, महिला काँग्रेस च्या अध्यक्ष नम्रता ठेमस्कर यांनी संस्थेच्या संचालिका अर्चना मानलवार यांच्या कडून संस्थेची माहिती घेतली. यावेळी उपस्थित काँग्रेस च्या सर्व पदाधिकाऱ्यांनी दिव्यांग महिलांना ब्लॅंकेट व फळ वाटप केले.

यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष प्रकाश देवतळे,
महिला काँग्रेस च्या अध्यक्ष नम्रता ठेमस्कर,चंद्रपूर तालुका काँग्रेस अध्यक्ष श्यामाकांत थेरे, महासचिव प्रमोद बोरीकर, चंद्रपूर जिल्हा काँग्रेस सोशल मीडियाचे अध्यक्ष मुन्ना तावाडे,महिला काँग्रेस च्या उपाध्यक्षा शितल कातकर, सेवादल महिला काँग्रेस च्या शहर अध्यक्ष लता बारापात्रे, मंगला शिवरकर, माला माणिकपुरी, मेहेक सय्यद, सीमा धुर्वे, नरेंद्र डोंगरे,मनोज कैथवास यांची उपस्थिती होती.