अखेर तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानात राशन उपलब्ध.. सामजिक कार्यकर्ता संजय अलोणे यांच्या पाठपुराव्याला यश..

418

प्रितम गग्गुरी (उपसंपादक)

अहेरी – गेल्या तीन महिन्यांपासून तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानात राशन उपलब्ध न झाल्याने राशन कार्ड धारकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची माहिती निदर्शनास येताच येथील सामाजिक कार्यकर्ते संजय अलोने यांनी गावकऱ्यांच्या सहका-याने अप्पर जिल्हाधिकारी यांच्या मार्फत जिल्हा पुरवठा अधिकारी यांना निवेदन देऊन राशन उपलब्ध करून राशन कार्ड धारकांना वाटप करण्याची मागणी केली होती, त्यांच्या या पाठपुराव्याला यश मिळाले असुन स्वस्त धान्य दुकानात राशन वाटपाचे काम सुरू आहे.

गेल्या सप्टेंबर, ऑक्टोंबर, नोव्हेंबर तीन महिन्यात स्वस्त धान्य दुकानात राशन उपलब्ध न झाल्याने दारिद्रयारेषाखालील येणा-या राशन कार्ड धारकांना राशन उपलब्ध न झाल्याने पोट भरण्याची समस्या निर्माण झाली होती. ही बाब लक्षात घेऊन राशन स्वस्त धान्य दुकानात राशन उपलब्ध करुन देण्यात यावे जेणे करुन दारिद्रयारेषाखाली येणा-या नागरिकांना व निराधार राशन कार्ड धारकांना कौटुंबिक, मानसिक त्रास होता कामा नये अशी मागणी जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे करण्यात आली होती.

यामध्ये अंत्योदय अन्न योजनामधे राशन कार्ड धारकांना 30 किलो तांदुळ, गहु 5 किलो आणि 1 किलो साखर आणि प्राधान्य योजना अंतर्गत 4 किलो तांदुळ, गहु 1 किलो राशन मिळते, यामुळे निराधाराना मोठ्या प्रमाणात आधार होत आहे, मात्र राशन उपलब्ध न झाल्याने अनेक कुटंबाला उपाशी पोटी राहण्याची वेळ निर्माण झाली आहे. सदर बाब समस्या लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते संजय अलोने यांनी अप्पर जिल्हाधिकारी यांच्या मार्फत जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती व अखेर त्यांच्या या पाठपुराव्याला यश मिळाले असुन नागरिकांनी संजय अलोने यांचे मनापासून आभार व्यक्त केले आहे.