प्रचंड मेहनत हेच यशाचे सूत्र – श्री लीलाधर पाटील 

501

दिनेश मंडपे
कार्यकारी संपादक

नागपुर – डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी प्रादेशिक कार्यालय नागपूर मार्फत मा. धम्मज्योती गजभिये (महासंचालक बार्टी पुणे) यांच्या मार्गदर्शनाखाली एक दिवसीय मराठी व्याकरण व व्यक्तिमत्त्व विकास प्रशिक्षण डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक हॉल येथे आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटक मा. सचिन कलंत्री( अध्यक्ष जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती नागपूर) तथा प्रमुख पाहुणे म्हणून मा. सुरेंद्र पवार (उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती नागपुर),मा. सुकेशीनी तेलगोटे ( सहाय्यक आयुक्त समाजकल्याण नागपुर),श्री लीलाधर पाटील (सहाय्यक पोलीस निरीक्षक, मुंबई),रुचा धाबर्डे, मुख्याधिकारी,नगर परिषद खापा,श्री राम वाघ सर याप्रसंगी उपस्थित होते.
स्पर्धा परीक्षा व इतर तत्सम परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी मा.लीलाधर पाटील यांचे एक दिवसीय विशेष मार्गदर्शन बार्टीनागपूर कार्यालयाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आले होते.
याप्रसंगी बोलताना श्री लीलाधर पाटील यांनी नुसती व्यक्ती महत्वाची नसून त्याच्या विकास कितीपत झाला यावरून त्या व्यक्तीची प्रतिष्ठा व किंमत ठरते तेव्हा व्यक्तीचा विकास साधण्यासाठी काय करायला हवे ते अतिशय मार्मिक शब्दात विद्यार्थ्याना पटवून दिले.यावेळी त्यांनी अनेक महापुरुषांचे संदर्भ व उदाहरणे दिलीत.प्रचंड मेहनत व अभ्यास यामुळे व्यक्ती कुठलीही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतो.जीवनात प्रगती साधायची असेल तर खूप अभ्यास करा व मोठे अधिकारी बनून समाजहितासाठी कार्य करा असे आव्हान त्यांनी याप्रसंगी केले.मराठी व्याकरण हा अतिशय महत्त्वाचा विषय असून अनेक विद्यार्थी याकडे दुर्लक्ष करीत असतात मात्र हा विषय समजून घेतल्यास अतिशय सोपा असून यामाध्यमातून आपण चांगले मार्क्स परीक्षेत प्राप्त करू शकता असेही त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मा. महासंचालक श्री धम्मज्योती गजभिये यांच्या वतीने श्री नितीन सहारे (प्रकल्प व्यवस्थापक बार्टी पुणे) व श्री रितेश गोंडाने ( कार्यालयीन अधीक्षक तथा समनव्यक बार्टी नागपूर) यांनी बार्टी मार्फत राज्यभरात प्रशिक्षणा संदर्भात सुरू असलेल्या योजनांची माहिती दिली.अश्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आव्हान सुद्धा यावेळी करण्यात आले.
श्री लीलाधर पाटील यांना ऐकण्यासाठी नागपूर शहरातील विद्यार्थ्यांची सभागृहात चांगलीच गर्दी उसळली.याकार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता कु.शीतल गडलिंग (प्रकल्प अधिकारी),श्री तुषार सूर्यवंशी (प्रकल्प अधिकारी),श्री हृदय गोडबोले (प्रकल्प अधिकारी),श्री नागेश वाहुरवाघ( प्रकल्प समनव्यक) श्री मंगेश चहांदे,श्री सुनील काकडे यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सतीश सोमकुवर ( समतादूत नागपूर) तर आभार श्री तुषार सूर्यवंशी (प्रकल्प अधिकारी) यांनी केले.