धाबा येथे भव्य नेत्रचिकित्या आणि रक्तदान शिबिर संपन्न

517

सिद्धार्थ दहागावकर (गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी)

गोंडपिपरी: तालुक्यातील श्री माता कन्यका सेवा संस्था व श्री संत परमहंस कोंडय्या महाराज संस्थान, धाबा यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच नामदार सूधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या सहकार्याने आणि अमर बोडलावर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने धाबा येथे भव्य नेत्रचिकित्या आणि रक्तदान शिबिर पार पडले.

वाढदिवसाच्या निमित्ताने अमर बोडलावार, माजी जि.प.सदस्य चंद्रपूर यांनी श्री कोंडय्या महाराजांच्या आशिर्वादाने कार्यक्रमाची सूरूवात केली. यावेळी त्यांनी समस्त जनतेच्या सूख समृद्धीसाठी, आनंदासाठी महादेवाचा अभिषेक करून प्रार्थना करण्यात आली. यावेळी नामदार सूधीरभाऊ मुनगंटीवार यांचे स्विय सहाय्यक शैलेश बैस, गोंडपिपरी तालुक्याचे तहसीलदार के. डी मेश्राम हे प्रामुख्याने उपस्थित होते.

कोंडय्या महाराजांच्या कृपेने तसेच सर्व प्रेमळ मित्रमंडळाकडून राबविण्यात आलेले समाजाभिमुख कार्यक्रम यशस्वी रीतीने पार पडले. यात रक्तदान शिबिरात 48 रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजासाठी मोलाच योगदान दिले. रक्तदात्यांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या. सोबतच मोफत नेत्र तपासणी करून नागरिकांना चष्मेवाटप, त्यांना मोफत मोतीबिंदू शस्रक्रियेसाठी निवड करून सेवाग्राम ला पाठविण्यात आले. तसेच आधार कार्ड अपडेट करणे, पोस्ट व बॅंकाचे विमा काढणे, ई उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वप्नील अनमूलवार, नंदाताई घोगरे, हिराजी कंदीकूरवार, अरूणजी कोडापे, संजयजी येलमूले, निलिमाताई कंदीकूरवार, अनिशा शेख, बबनजी पत्तीवार, बाबूरावजी बोमकंटीवार, आशिष मामीडपेल्लीवार, हरीश घोगरे, बबनजी निकोडे, नाना येल्लेवार, अरूणा जांभूळकर, साईनाथ मास्टे, सूहासजी माडूरवार, विजयजी शेरकूरवार, राहूल चौधरी, गणपती चौधरी, बंटी बोनगिरवार, निश्चल मारशेट्टीवार, अखिल चंदनगिरीवार, निखिल चंदनगिरीवार, सूरज भस्की, सूरज फरकडे, अक्षय पोटे, संस्कार बोडलावार, समीर माडूरवार तसेच प्रतिष्ठित नागरिक उपस्थित राहून अथक परिश्रम घेतले.