समाजप्रबोधन कार्यक्रमातून वाहिली आदरांजली

477

बळीराम काळे,जिवती

जिवती : (ता.प्र.) तालुका अंतर्गत माराईपाटण येथील सोमेश्वर शंकर सोंनकांबळे, केशव शंकर सोनकांबळे, गौतम शंकर सोनकांबळे,आणि मुलगी हौशाबाई यांच्या मातोश्री तानेबाई शंकर सोनकांबळे यांचा दिनांक १२ ऑगषट २०२२ रोजी त्यांच दुःखद निधन झालं होते.
त्यानिमित्ताने सर्व कुटुंबीयांनी विदर्भाचा बुलंद आवाज ख्यातनाम गायक भिमशाहीर,संभाजी ढगे यांचा भीम गीतांचा कार्यक्रमाच्या माध्यमातून (तानेबाई सोनकांबळे) यांना आदरांजली वाहिली.
तसेच शाहीर संभाजी ढगे यांनी आपल्या भीम गीतांच्या माद्यमातून समाज प्रबोधनपर अंधश्रद्धा, व्यसनमुक्ती, सार्वजनिक आरोग्य सेवा ,तसेच महाराष्ट्र हा संत महापुरुषांच्या विचारांचा भारत देश असून,सुद्धा वारंवार महापुरुषांच्या बाबतीत,विटंबना व अपमानास्पद शब्द बोलले जाते आहे. व पाहवयास मिळते आहे. म्हणून यात सर्वसाधारण जनतेच काय,असा प्रश्न उदभवतो आहे.अशी परिस्थिती निर्माण होईल,म्हणून भीम शाहीर यांनी आपल्या गायनाच्या माध्यमातून जनतेनी आवाज उठवायला पाहिजे,आणि भारतीय संविधान वाचविले पाहिजे असे गीत गायनाच्या माध्यमातून समस्त गावकरी मंडळी यांना पटवून सांगितले.
त्यावेळी गावातील सरपंच सौ.शेशिकला कोटनाके,उपसरपंच विकास सोनकांबळे, गावातील पोलीस पाटील राहुल सोनकांबळे, सामाजिक कार्यकर्ते मोहन टोंपे,गौतम लव्हराळे, मिलींद सोनकांबळे,सागर टोंपे,समाधान सोनकांबळे,अशोक तांबरे,तुकाराम वारालवाड,
गावातील प्रतिष्ठित नागरिक शेषराव संभाजी कांबळे व बाहेर गावातील नागरिकांची व बहुजन समाजातील
समाज बांधवांची उपस्थिती होती.