जनतेनेच प्रकाशित करावे लोकप्रतिनिधींच्या प्रगतीचे पुस्तक : खासदार बाळू धानोरकर

195

चंद्रपूर : लोकप्रतिनिधी हा जनतेच्या सेवेसाठी काम करत असतो. लोकसभा असो की विधानसभा तो आपले प्रश्न मांडत असतो. विविध आयुधांचा वापर करून निधी खेचून आणतो. मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न करतो. या कामाचे मूल्यमापन जनतेकडून झाले पाहिजे, यासाठी जनतेतूनच लोकप्रतिनिधींच्या प्रगतीचे पुस्तक तयार व्हावे, अशी अपेक्षा खासदार बाळू धानोरकर यांनी व्यक्त केली.

वरोरा- भद्रावती मतदार संघाच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पूर्वसंध्येला अभिष्टचिंतन सोहळ्यात ते बोलत होते.

यावेळी राजुरा विधानसभेचे आमदार सुभाष धोटे, विधान परिषद आमदार ऍड. अभिजीत वंजारी, आमदार प्रतिभाताई धानोरकर, माजी आमदार देवराव भांडेकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महासचिव विनोद दत्तात्रय, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव विजय नळे, यवतमाळ मध्यवर्ती बँक अध्यक्ष टिकाराम कोंगरे, चंद्रपूर काँग्रेस शहर अध्यक्ष रितेश तिवारी, चंद्रपूर ग्रामीण काँग्रेस अध्यक्ष प्रकाश देवतळे, वसंत जिनींग अध्यक्ष आशिष कुलसंगे, महिला शहर अध्यक्ष संगिताताई अमृतकर, महिला ग्रामीण जिल्हाध्यक्ष नम्रता ठेमस्कर, माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, माजी नगराध्यक्ष सुनिताताई लोढिया, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सोहेल शेख, अनुसूचित राज्य महिला उपाध्यक्ष अश्विनी खोब्रागडे, चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती दिनेश चोखारे, ग्रामीण जिल्हाप्रमुख युवक काँग्रेस शंतनू धोटे, शहर अध्यक्ष युवक काँग्रेस राजेश अडूर, माजी नगरसेवक गोपाल अमृतकर, वरोरा शहर काँग्रेस अध्यक्ष विलास टिपले, भद्रावती काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रशांत काळे, भद्रावती काँग्रेस शहर अध्यक्ष सुरज गावंडे, वरोरा काँग्रेस तालुका अध्यक्ष मिलिंद भोयर, एनएसयूआय जिल्हाध्यक्ष यश दत्तात्रय, इंटक जिल्हाध्यक्ष प्रशांत भारती, जिल्हा परिषद उपाध्यक्ष विनोद अहिरकर, ओबीसी शहर अध्यक्ष नरंेद्र बोबडे, खोडे सर, चंद्रपूर तालुका काँग्रेस अध्यक्ष शामकांत थेरे, काँग्रेस घुगुस शहर अध्यक्ष राजू रेड्डी, यांची उपस्थिती होती.

यावेळी राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी लोकप्रतिनिधींनी आपली जबाबदारी ओळखून वागले पाहिजे. असे प्रतिपादन केले. स्त्री – पुरुष असा विशेष फरक आजकाल राहिला नसून महिलांनी सर्वच क्षेत्रावर प्राबल्य सिद्ध केले असल्याचे ते म्हणाले.

विधान परिषदेचे आमदार अभिजित वंजारी म्हणाले कि, चंद्रपूर जिल्ह्यात खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या माध्यमातून सक्षम नेतृत्व लाभले आहे. सामान्य नागरिकांना डोळ्यासमोर ठेऊन ते या क्षेत्राचा विकास करीत आहेत. पुढे देखील असाच विकासाचा झंझावात सुरु राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आमदार प्रतिभाताई धानोरकर म्हणाल्या कि, अनेक आमदार होतात आणि अनेक जातात कधीही पदाचा व पैशाचा अहंकार लोकप्रतिनिधींनी करता कामा नये, समाजातील शेवटच्या घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न लोकप्रतिनिधींनी करावा असा मानस व्यक्त केला.

याप्रसंगी प्रल्हाद रामसिंग धनावत या भारतीय जवानाने २ तास १३ मिनिट ५२ सेकंदात ४१ किलोमीटर अंतर पार करीत प्रथम क्रमांक पटकाविला. ५१ हजार रुपयाचे दुसरे पारितोषिक महेश वाढई रा. चंद्रपूर, तृतीय पारितोषिक दीपक सिरसाट रा. नाशिक, चतुर्थ पारितोषिक अजित झा.रा. ठाणे , पाचवे पारितोषिक निखील सिंह रा. मुंबई, यांनी पटकाविले. त्यांना देखील यावेळी रोख व मोमेंटो देऊन सन्मानित करण्यात आले. त्यासोबत गांधी चौक, चंद्रपूर येथे सायंकाळी ६ वाजता राज्यस्तरीय ४१ किमी मॅरेथॉन स्पर्धेचे बक्षीस वितरण, गरजू विद्यार्थिनींना सायकल वाटप व वैद्यकीय उपकरण भेट व प्रसिद्ध प्रबोधनकर अनिरुद्ध वनकर यांच्या प्रबोधनपर गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.