दहेगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंचसह चार सदस्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश

554

वरोरा: सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या आदेशानुसार, चंद्रपूर ग्रामीण जिल्हा अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली, भाजपा जिल्हा महामंत्री नामदेव डाहूले तसेच माजी नगरसेवक चंद्रपूर शहर महानगपालिका प्रशांत चौधरी व राजू दोडके यांच्या उपस्थितीमध्ये वरोरा तालुक्यातील दहेगाव ग्रामपंचायत येथील शिवसेना पक्षाचे उपसरपंच महेश विश्वनाथ सोनटक्के यांनी भारतीय जनता पक्षावर विश्वास ठेऊन आज जाहीर प्रवेश केला. त्यांच्यासोबत ग्रामपंचायत सदस्य विशाल पंढरी डाहूले, सौ रंजना विठ्ठल वाभीटकर, सौ रुपाली दत्तू टाले यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्याबद्दल त्यांचे पक्षाकडून अभिनंदन करण्यात आले. या कार्यक्रमास भारतीय जनता पक्षाचे चंद्रपूर तालुका सचिव भारत रोहने, आशिष वाढई सचिव, दहेगाव येथील जेष्ठ नागरिक तसेच इतर कार्यकर्ते ग्रामवासी उपस्थित होते. सोबतच विठ्ठल वाभीटकर, गणपत डवरे, ज्ञानेश्वर मेश्राम,राकेश टाले, दिगंबर टाले, मंगेश सोनटक्के, धिरज कोठे, नलेश दरेकर, संदीप मेश्रम, पत्रुजी बेलेकर, मोतीराम तामगाडगे, वारलू झाडे, ज्ञानू माहुरे, पंढरी डाहूले, मंगेश चिडे, रविंद्र तामगाडगे, अमोल टाले, हरी डाहूले उपस्थित होते.